MLA Disqualification Case : शरद पवार गटाला झटका; आमदार अपात्रतेप्रकरणी स्वतंत्र सुनावणीस नकार, शिवसेना-राष्ट्रवादीची एकत्र सुनावणी होणार

NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पक्षातून बाहेर पडलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

New Delhi Political News: आमदार अपात्रतेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला झटका बसला आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी राष्ट्रवादीचे स्वतंत्र प्रकरण ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे ता. १३ तारखेला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी एकत्र घेणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. (Ncp and Shivsena mla disqualification case supreme court hearing on friday)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पक्षातून बाहेर पडलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता. ९ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू ऐकून घेण्यास नकार दर्शविला आहे. सर्वोच्च न्यायालयात येत्या १३ तारखेला शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी एकत्र सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Supreme Court
Solapur politics : ‘सोलापूरकरांनो, पाणीपट्टी भरू नका… कमिशनरच्या दारात पहिला हंडा घेऊन मी उभी राहते’

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन्ही प्रकरणांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यास नकार दिला. आता या प्रकरणी शुक्रवारी एकत्रित सुनावणी घेतली जाईल, असे सांगितल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

ज्या पद्धतीने राजकीय नेतृत्वाकडून हे प्रकरण हाताळण्यात येतंय. ते पाहता आम्हाला आता सर्वोच्च न्यायालयाकडूनच न्यायाची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण गांभीर्याने घेताना दिसतंय. आम्ही २ जुलैलाच आमदार अपात्रतेप्रकरणी याचिका दाखल केली आहे. ती कधी दाखल केली, हे महत्त्वाचे नाही. त्यावर निर्णय किती दिवसांत अपेक्षित आहे, हे महत्त्वाचे आहे.

Supreme Court
Sule Attack on BJP MP : ‘सोलापूरचा खासदार कौन है भैया?... मिसिंग है बॉस...’ : सुप्रिया सुळेंचा महास्वामींवर हल्लाबोल

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. शुक्रवारी सुनावणी होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. विधिमंडळ पक्ष व मूळ पक्ष वेगळा असल्याचे स्पष्ट करीत जितेंद्र आव्हाड यांनी येत्या काळात सर्वोच्च न्यायालयाकडून याबाबत न्याय मिळेल, असे स्पष्ट केले.

Supreme Court
Sule Vs Bhujbal : ...नाहीतर भुजबळांना करारा जवाब दिला असता; पवारांवरील टीकेवरून सुप्रिया सुळे आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com