Donald Trump, Benjamin Netanyahu Sarkarnama
देश

US Iran Agreement : इस्त्रायलने काही तासांतच उधळले ट्रम्प यांचे मनसुबे; जगावरील युध्दाचे सावट कायम...

Israel Donald Trump News : अमेरिकेसोबत करारानंतर इराण पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन अणुकार्यक्रमाला बळकटी देऊ शकते, अशी भीती इस्त्रायलकडून व्यक्त केली जात आहे.

Rajanand More

Israel Latest News : अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार झाल्याच्या घोषणेला काही तास उलटताच इस्त्रायलने जोरदार झटका दिला आहे. आपण या कराराशी बांधील नसल्याचे स्पष्ट करत इस्त्रायलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. त्यामुळे जगावरील युध्दाचे सावट अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इस्त्रायलने शांतता कराराबाबत उघडपणे असहमती दर्शविली आहे. इस्त्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतमार बेंग्वीर यांनी सोमवारी करारावर भाष्य करताना आपण बांधील नसल्याचे सांगितले. सुरक्षाविषयक निर्णय घेण्यास आम्ही स्वतंत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बेंग्वीर यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट केली आहे.

आम्ही ज्यावेळी आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकलो, त्या प्रत्येकवेळी आम्हाला त्याची किंमत इस्रायलच्या सुरक्षेच्या बदल्यात मोजावी लागली आहे. त्याची मोठी रक्तरंजित किंमत व्याजासह चुकवावी लागल्याचे बेंग्वीर यांनी म्हटले आहे. इस्त्रायलच्या या भूमिकेमुळे आता अमेरिकेची मोठी कोंडी झाली आहे. इस्त्रायलने लेबनॉन आणि सीरियावर हल्ले सुरूच ठेवले आहेत.

अमेरिकेच्या भरवशावर आपल्या देशाची सुरक्षा सोडण्यास इस्त्रायल तयार नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लेबनॉनविरोधात इस्त्रायलवरील हल्ले वाढविले जाऊ शकतात. त्याचा परिणाम पुन्हा होर्मुझ सामुद्रधुनीतील मालवाहतुकीवर होऊ शकतो. इस्त्रायलच्या या भूमिकेमुळे जगावरील संकट अद्याप टळले नसल्याचे स्पष्ट आहे.

इराणसोबत करण्यात आलेला कोणताही समझोता विश्वासार्ह असून शकत नाही. जोपर्यंत अणुकार्यक्रम पूर्णपणे थांबविला जाऊ शकत नाही किंवा नष्ट केला जाऊ शकत नाही, तोपर्यंत कोणताही समझोता टिकणार नाही, असे इस्त्रायलचे म्हणणे आहे. अमेरिकेसोबत करारानंतर इराण पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन अणुकार्यक्रमाला बळकटी देऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

करारावर चर्चा सुरू असतानाच इस्त्रायलकडून सातत्याने इराणवर हल्ले सुरूच ठेवण्यात आले आहेत. प्रामुख्याने इराणचे हवाई दल आणि गुप्तचर यंत्रणांवर हल्ले केले जात आहेत. त्याचप्रमाणे इराणच्या शेजारील लेबनॉन आणि सीरियालाही लक्ष्य केले जात आहे. इस्त्रायलची ही भूमिका म्हणजे अमेरिकेच्या प्रयत्नांना थेट आव्हान असल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT