

West Bengal News : आमदार, खासदारांच्या बंडांमुळे आधीच मोठा धक्का बसलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणखी अडचणीत आल्या आहेत. बंडखोर खासदार काकोली घोष दस्तगीर यांचे डॉक्टर पुत्र बैद्यनाथ यांनी ममतादीदींसह पक्षातील अन्य काही नेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
बैद्यनाथ घोष यानी ममतांसह खासदार कल्याण बॅनर्जी, सौगत रॉय, महुआ मोइत्रा, आमदार सोनाली गुहा यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. आईसह आपल्यावर केलेल्या आरोपांबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. माफी न मागितल्यास कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
काय आहे दावा?
बरासत विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळविण्यासाठी आईने पक्षाकडे मागणी केली नाही, हा दावा चुकीचा असल्याचे घोष यांनी म्हटले आहे. याउलट पक्षाच्या राजकीय कन्सल्टनी संस्थेकडून आपल्याला निवडणूक लढविण्यासाठी सातत्याने विचारणा केली जात होती, असा दावा घोष केला आहे.
सोनाली गुहा यांनी बैद्यनाथ, त्यांच्या आई खासदार काकोली घोष आणि भाऊ सतत मद्यप्राशन करत असल्याचा आरोप केला होता. हा दावा बैद्यनाथ यांनी फेटाळून लावला आहे. हे विधान मानहानीकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. घोष यांनी या मुद्दयांच्या आधारे ममतादीदींसह काही नेत्यांविरोधात कायदेशीर लढाई सुरू केली आहे.
सोन्याचे नेकलेस परत
बैद्यनाथ घोष यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत आपण ममता बॅनर्जी यांनी दिलेले सोन्याचे नेकलेस परत करत असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमच्या लग्नामध्ये ममता बॅनर्जी यांनी पत्नीला भेट म्हणून दिलेले सोन्याचे नेकलेस ाणि दुर्गा पूजावेळी दिलेला कुर्ता-पायजमा मी परत करत आहे. या सन्मानाबद्दल मी कृतज्ञ आहे. पण अलीकडील घडामोडी आणि माझ्या सद्सद्विवेकबुद्धीचा विचार करता, या भेटवस्तू परत करत असल्याचे घोष यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.