Smoke rises after reported strikes as tensions escalate between Israel, the US, and Iran, raising fears of a broader Middle East conflict. sarkarnama
देश

Israel Attack Iran : इस्त्रायल-अमेरिकेचा इराणवर हल्ला;युद्धाचा भडका उडणार!

Israel US Attack War :  इराणवर इस्त्रायलने हल्ला चढवला. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खेमेणी यांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले असल्याचे वृत्त जागतिक वृत्तसंस्थांनी दिले आहे.

Roshan More

Israel Attack : इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आहे. इराण तेहरान शहरामध्ये हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्त्रायलच्या सुरक्षामंत्र्यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे युद्धाचा भडका उडण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक मोठे स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर इस्त्रायलकडून हल्ला केल्याचे सांगण्यात आले. इराण युद्धाच्या तयारीत होता त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या दृष्टिने आपण आधी हल्ला केला, असे इस्त्रायलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हा प्रिव्हेंटीव अॅटक आहे, असे सांगितले जात आहे.

इराण आणि अमेरिकेमध्ये त्यांच्या अणुकार्यक्रमाबाबत वाटाघाटी सुरू आहेत. गुरुवारी जिनेव्हा येथे दोन्ही देशांमधील तिसरी फेरीची चर्चा झाली आणि आज आणखी एक फेरी होणार होती. मात्र त्यापूर्वीच आज इराणवर इस्त्रायलने हल्ला चढवला. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खेमेणी यांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले असल्याचे वृत्त जागतिक वृत्तसंस्थांनी दिले आहे.

भारताने दिला होता इशारा

इराणमध्ये असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी भारत सरकारने दोन दिवसांपूर्वीच इराण सोडण्याची सूचना दिली होती. सुरक्षितस्थळी जाण्याचे तसेच इराण सोडण्याचे आवाहन भारत सरकारकडून इराणमधील भारतीय नागरिकांना करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT