BJP majority Dharashiv : धारशिव झेडपीत भाजपचाच अध्यक्ष होणार, बॅनरबाजीमुळे 'हे' नाव चर्चेत; तानाजी सावंतांना धक्का!

Dharashiv ZP President News : धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे नक्की जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता लागली आहे.
tanaji sawant, dyanraj choghule, rana patil, kailas patil, om rajenimbalkar
tanaji sawant, dyanraj choghule, rana patil, kailas patil, om rajenimbalkar Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. 56 सदस्य असलेल्या झेडपीत 19 सदस्यांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. सध्या त्यांच्यासोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य आहेत तर त्याशिवाय तीन अपक्ष व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन सदस्य आहेत. त्यामुळे आता भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालीमुळे सत्तास्थापनेबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता.

त्यातच आता भाजप कार्यकर्त्यांनी धाराशिवमध्ये बॅनरबाजी केली असून भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील झेडपीच्या अध्यक्षा होणार? असे बॅनर लावले आहेत. तर दुसरीकडे पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला असून 13 मार्चला बैठक बोलावली आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकासाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडले होते तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडली. त्यानंतर जिल्हा परिषदेवर महायुतीचे बहुमत असले तरी सत्ता स्थापनेबाबत तिढा निर्माण झाला होता. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोचली होती. या ठिकाणी सत्तास्थापन करीत असताना महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेनेला सोबत घेणार का? याची उत्सुकता लागली आहे.

tanaji sawant, dyanraj choghule, rana patil, kailas patil, om rajenimbalkar
BJP Politics : भाजप नगरसेवकांना बंडखोरी भोवणार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी उचलले मोठं पाऊल, भिवंडी प्रकरणाची गंभीर दखल

धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचे एकत्रित 40 सदस्य निवडून आले आहेत. त्यामध्ये 19 सदस्यांसह भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धाराशिव जिल्हा परिषदेत 15 सदस्य आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य आहेत. त्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 7 सदस्य तर काँग्रेसचे 3 सदस्य निवडून आले आहेत तर त्याशिवाय चार अपक्ष व दोन्ही शिवसेनेचे एक-एक बंडखोर निवडून आला आहे.

tanaji sawant, dyanraj choghule, rana patil, kailas patil, om rajenimbalkar
Shivsena Rajya Sabha: 'मातोश्री'तून मोठी अपडेट, ठाकरे गेम पालटणार; शरद पवार अन् काँग्रेसला धक्का देणारा शिवसेना आमदाराचा दावा समोर

शिवसेनेचे (Shivsena) आमदार तानाजी सावंत यांचा अर्चना पाटील यांच्या अध्यक्ष पदाला विरोध आहे. तर शिंदे यांच्या शिवसेनेचा एक गट भाजपसोबत आहे. गेल्या 20 दिवसापासून भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, तीन अपक्ष व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन सदस्य असे 30 सदस्य त्यांच्या सोबत आहेत. हे सर्व 30 सदस्य सहलीवर आहेत. भाजपकडे बहुमताएवढे संख्याबळ असल्याने आता धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपच्या अर्चना पाटील अध्यक्ष होणार अशी चर्चा जोरात रंगली आहे.

tanaji sawant, dyanraj choghule, rana patil, kailas patil, om rajenimbalkar
Ashok Chavan on NCP : नांदेड महापालिकेत कसेबसे खाते उघडलेल्या राष्ट्रवादीला अशोक चव्हाणांचा खोचक टोला,'घड्याळ आता हळूहळू..!'

धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष वहिनी साहेब, असे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी लावले आहेत. त्यामुळे नक्की जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 15 व उद्धव ठाकरे यांचे 7 व काँग्रेसचे 3 व अपक्ष तीन व बंडखोर 2 असे सत्ता समीकरण भाजप विरोधी गटाकडून जुळवले जात आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

tanaji sawant, dyanraj choghule, rana patil, kailas patil, om rajenimbalkar
congress Vs bjp :'भाजपची शेवटची फडफड, त्यांचा शेवट जवळ आलाय'; काँग्रेस उपमुख्यमंत्र्याची जळजळीत टीका

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार ?

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार 13 मार्चला जिल्हा परिषद सदस्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे आता उत्सुकता शिगेला पोहचली असून भाजपकडून अर्चना पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, दुसरीकडे भाजप विरोधी मंडळी काय निर्णय घेणार यावर येथील समीकरण अवलंबुन आहे. महायुतीमधील वरिष्ठ पातळीवरून या ठिकाणी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला सुचवला आहे. मात्र, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

tanaji sawant, dyanraj choghule, rana patil, kailas patil, om rajenimbalkar
Dharashiv ZP : धाराशिव झेडपीचं सत्तासूत्र ठरलं : महायुती एकत्र येणार; पण सावंत गटाला धक्का बसणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com