Narendra Modi, Amit Shah News Sarkarnama
देश

BJP News : विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर भाजपा करणार एनडीएचे शक्तीप्रदर्शन...

Congress News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून एकत्र येण्यासाठी बैठका सुरु आहेत.

Amol Jaybhaye

NDA News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून एकत्र येण्यासाठी बैठका सुरु आहेत. त्यातच भाजपा देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) आकार देण्यात गुंतला आहे. भजपानेही एनडीएचीही शक्ती दाखवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी एनडीएची लवकरच बैठक अपेक्षित असल्याचे भाजपाच्या (BJP) सूत्रांनी सांगितले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, शिरोमणी अकाली दल आणि जनता दल (युनायटेड) यांसारख्या काही जुन्या मित्रपक्षांच्या जाण्याने एनडीएचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात कोणत्याही प्रकारच्या संभाव्य फेरबदलात भाजपला पाठिंबा मिळालेल्या सर्व मित्रपक्षांचा समावेश करण्याचा प्रयत्न आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात मित्रपक्षांचे फक्त तीन सदस्य आहेत.

यामध्ये आरएलजेपीचे पशुपती कुमार पारस हे एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. तर अपना दलाच्या अनुप्रिया पटेल आणि आरपीआयचे रामदास आठवले हे राज्यमंत्री आहेत. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकल्याबद्दल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका करणाऱ्या निवेदनावर भाजपाने अलीकडेच १३ पक्षांच्या नेत्यांच्या सह्या घेतल्या होत्या. निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि AIADMK नेते पलानीस्वामी याशिवाय ईशान्येकडील राज्यांतील सत्ताधारी पक्षांचे प्रतिनिधीत्व करणारे नेते होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतली. अजेंड्यावर काय होते याबाबत स्पष्टता नाही. मात्र, केंद्रीय मंत्री मंडळात संभाव्य फेरबदल आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बहुप्रतिक्षित विस्तारावर चर्चा झाल्याचे समजते. बिहारमधील RJD-JD(U) छावणीतील छोट्या पक्षांना जोडण्यासाठी भाजपा राज्यात आपली ताकद मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

बिहारच्या सत्ताधारी आघाडीच्या बाजूने भक्कम सामाजिक समीकरणही आहे. JD(U) सोडून स्वतःचा पक्ष काढणारे माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी, ज्यांचा मुलाने नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, त्यांनी गृहमंत्री अमित शाहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली आहे.

चिराग पासवान यांनाही युतीमध्ये परत आणण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. सत्ताधारी पक्षाने पुढील महिन्यात काही महत्त्वाच्या संघटनात्मक बैठका घेतल्याने मित्रपक्षांना एकत्र आणण्यावर त्यांचा भर असेल, असे सांगितले जात आहे. 23 जून रोजी पाटणा येथे झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एकजुटीने भाजपाशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर भाजपानेही एनडीऐला मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT