Narendra Modi
Narendra Modi sarkarnama
देश

हिमाचलमध्ये बंडखोरांनी भाजपला घेरलं; थेट पंतप्रधांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी फोन केला?

सरकारनामा ब्यूरो

Himachal Pradesh Election News : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या विजयासाठी भाजप-काँग्रेससह सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. मात्र, बंडखोर उमेदवारांनी भाजपची मोठी अडचण केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजपच्या (BJP) बंडखोर उमेदवाराला फोन करून निवडणूक लढवू नका, असे सांगितल्याचा दावा, करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मोदींचा आवाज ऐकू येत आहे. कांगडा जिल्ह्यातील फतेहपूर मतदारसंघातून भाजपचे कृपाल परमार यांना तिकीट न मिळाल्यामुळे ते अपक्ष मैदानात उतरले आहेत. त्यानंतर मोदींनी फोन करून त्यांना निवडणूक लढवू नका, असे सांगितल्याचा दावा व्हिडीओमध्ये करण्यात येत आहे.

काँग्रेसने (Congress) च्या नेत्या अलका लांबा आणि काँग्रेसचे राष्ट्रीय यूवक अध्यक्ष यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान मोदी यांनी बंडखोर नेत्याला स्वतः फोन करून निवडणूक लढवू नका, असे सांगितले आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा (Alka Lamba) यांनी कृपाल परमार यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

भाजप सरकारवर टीका करताना अलका लांबा म्हणाल्या, 'हिमाचलमधील सरकार वाचवण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्र राज्यमंत्री, क्रीडामंत्री आणि मुख्यमंत्री सर्वजण कामाला लागले आहेत. मात्र, भाजपचा पराभव निश्चित आहे. असा दावा त्यांनी केला आहे.

काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी म्हटले आहे, तो दिवस आलाच! भारताचे पंतप्रधान हिमाचलमधील बंडखोर भाजप नेत्यांना फोन करत आहेत. निवडणुकीतून बाहेर पडा, असे सांगत आहेत. त्यांना आता पराभवाची भीती वाटू लागली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कृपाल परमार म्हणताहेत, "नमस्ते जी... मी कधी बोलू, माझे कोण ऐकणार..असा सवाल त्यांनी केला आहे.

समोरून एक व्यक्ती परमारांना निवडणुकीतून बाहेर पडा, असे सांगत आहेत. परमार हे पंतप्रदान मोदींशी बोलत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विरोधी पक्षांनी या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT