Omar Abdullah On J&K Results Sarkarnama
देश

J&K Election Results : "आम्हाला विजयाची खात्री पण भाजपने जुगाड..."; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली वेगळीच भीती

Jagdish Patil

J&K assembly election results live : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. दोन्ही राज्यातील मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्याचं झालेल्या या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोणाचं पारडं जड राहणार याकडे देशभरातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल एका दशकानंतर विधानसभा निवडणूक पार पडली आहे.

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir Result ) जनता कोणाला कौल देणार याचे चित्र जवळपास स्पष्ट होत आहे. या निकालाच्या सध्याच्या आकडेवारीनुसार तरी राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस (Congress)पक्ष आघाडीवर आहेत. तर भाजप पिछाडीवर आहे.

अशातच नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी माध्यमांशी संवाद साधताना या निवडणुकीत आमचाच विजय होणार आहे. मात्र, जनतेचा कौल भाजपच्या (BJP) विरोधात असेल तर त्यांनी पारदर्शक पद्धतीने निकाल स्वीकारला पाहिजे कोणताही जुगाड करून नये, असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपला बहुमत मिळालं नाही तर भाजप काहीही करून सत्ता स्थापन करू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

ओमर अब्दुल्ला नेमकं काय म्हणाले?

राज्यातील निकालावर भाष्य करताना ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) म्हणाले, "आम्हाला आमच्या विजयाची खात्री वाटते. जम्मू-काश्मीरच्या मतदारांचा कौल दुपारपर्यंत समोर येईलच. मात्र, या निकालात पारदर्शकता हवी. या ठिकाणी जे काही होईल ते पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे. जनतेचा कौल स्वीकारला पाहीजे.

इथल्या जनतेने भाजपच्या विरोधात कौल दिला असेल तर त्यांनी तो काहीही जुगाड न करता स्वीकारला पाहिजे. राजभवनने देखील कोणताही हस्तक्षेप न करता हा कौल स्वीकारावा." अनेक एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे येथील पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स (National Conference Party) हे पक्ष काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

तर माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सनचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी देखील भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मेहबूबा मुफ्तींच्या 'पीडीपी' पक्षाशी आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे इथे काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स होण्याचीही शक्यता वर्तवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT