Haryana Election Result : हरियाणात प्रशासनावर दबाव, काँग्रेसला भलतीच शंका; निवडणूक आयोगाकडे तक्रार

Jairam Ramesh Congress BJP : हरियाणामध्ये भाजप पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. भाजपचा हा ऐतिहासिक विजय ठरणार आहे.
Haryana Election
Haryana ElectionSarkarnama
Published on
Updated on

Election Commission of India : हरियाणात भाजपने बहुमताचा आकडा पार केल्यानंतर काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अद्याप सुरूवातीच्या काही फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यात भाजपने मुसंडी मारली आहे. पण काँग्रेसला भलतीच शंका आहे. अनेक मतदारसंघात 10-11 फेऱ्यांचे मतदान पूर्ण होऊनही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी आकडे अपडेट केले जात नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

हरियाणातील 90 जागांपैकी जवळपास 49 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर दहा वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्न पाहणाऱी काँग्रेस 35 जागांवर अडकली आहे. हे कल असेच राहिल्यास भाजप हॅट्ट्रिक करत पुन्हा सत्ता काबीज करेल.

Haryana Election
Jammu-Kashmir Election Results : मोदींचा ‘नवा काश्मीर’चा नारा, 370 ची जादू फेल; INDIA ने गाठले अर्धशतक

सुरूवातीच्या काही फेऱ्यांचे कल हाती येत असून भाजपने अनेक मतदारसंघात मोठी आघाडी घेतली आहे. पण काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करत आहोत. आमच्या प्रश्नाचे आयोग उत्तर देईल, अशी आशा आहे. बहुतेक मतदारसंघातील 10 ते 11 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे.

आयोगाच्या संकेतस्थळावर केवळ 4 ते 5 फेऱ्यांचेच अपडेट दिसत आहे. प्रशासनावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे. यावरून भाजपने काँग्रेसवर पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटले आहे की, जयराम रमेश यांनी आतापासूनच निवडणूक आयोगाकडे बोट दाखवण्यास सुरूवात केली आहे. म्हणजेत त्यांनी आपला पराभव मान्य केला आहे.

Haryana Election
Haryana Election Results : भाजपची जोरदार मुसंडी; लाडू-जिलेबी वाटणाऱ्या काँग्रेसला धक्का

सध्याच्या कलांनुसार भाजप ऐतिहासिक विजयाच्या दिशेने आहे. त्यामुळे काँग्रेसने भविष्यातील पराभवासाठी आतापासूनच कारणे शोधण्यास सुरूवात केल्याची टीका त्रिवेदी यांनी केली आहे. दरम्यान, या मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असे अंदाज वर्तवण्यात आले होते. पण हे अंदाज सध्यातरी चुकताना दिसत आहेत.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com