Jagdeep Dhankhar sarkarnama
देश

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड कुठे आहेत? मोठी माहिती आली समोर : राजीनाम्यानंतर बेपत्ता असल्याच्या चर्चांना पूर्णविराम!

Former Vice President Jagdeep Dhankhar latest update : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले त्यादिवशी तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीतीचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती.

Jagdish Patil

Jagdeep Dhankhar latest update : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले त्यादिवशी तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीतीचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती.

शिवाय कोणतीही पुर्वकल्पना न देता धनखड यांनी राजीनामा का दिला? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून ते कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यामुळे विरोधकांनी सरकारकडे धनकड नेमके कुठे आहेत याबाबतची माहिती द्या, अशी मागणी केली होती.

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर  जगदीप धनखड यांचा ठाकठिकाणा न समजणे ही गंभीर बाब असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता धनखड नेमके कुठे आहेत आणि ते सध्या काय करत आहेत. याबाबतची माहिती समोर आली आहे.

धनखड सध्या काय करत आहेत?

त्यांच्या जवळच्या लोकांनी एका वृ्त्त संस्थेला धनकड सध्या काय करत आहेत. याबाबतची माहिती दिल्यामुळे धनखड हे बेपत्ता झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. माजी उपराष्ट्रपती हे सध्या त्यांच्या घरातील सदस्य, मित्र व उपराष्ट्रपतींच्या एन्क्लेव्हमधील कर्मचाऱ्यांबरोबर टेबल टेनिस खेळत आहेत. तसंच ते योगाभ्यास करण्यात व्यस्त असल्याची माहिती धनखड यांच्या जवळच्या लोकांनी एका वृ्त्त संस्थेला दिल्याचं समोर आलं आहे.

राऊत काय म्हणाले होते?

संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, "धनखड यांना निवासस्थानी बंदिस्त करण्यात आले असून ते सुरक्षित नसल्याच्या अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी देशाला माहिती मिळणे गरजेचे आहे. काही खासदारांना धनखडांची काळजी वाटत असल्याने ते सर्वोच्च न्यायालयात 'हेबिअस-कॉर्पस रिट' याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT