BJP vs Shivsena : उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये आलेल्या वैशाली सूर्यवंशींचा शिंदेंच्या आमदारावर हल्लाबोल

Vaishali Suryavanshi On MLA Kishor Patil : पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे पक्षाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी नुकताच भाजप प्रवेश केला. या संदर्भात त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर "पन्नास खोके एकदम ओके" या आरोपाची पुनरावृत्ती केली.
Vaishali Suryavanshi, MLA Kishor Patil
Vaishali Suryavanshi, MLA Kishor PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News, 23 Aug : पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे पक्षाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी नुकताच भाजप प्रवेश केला. या संदर्भात त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर "पन्नास खोके एकदम ओके" या आरोपाची पुनरावृत्ती केली.

वैशाली सूर्यवंशी यांनी भाजप प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजप प्रवेश केल्याबाबतची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. मी गद्दार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. त्यानंतरच भाजप प्रवेश केल्याचं त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाऊ आमदार किशोर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. मी खोके घेऊन प्रवेश केलेला नाही. टक्केवारीचे पैसे घेऊन गब्बर झालेली नाही. माझे राजकारण अतिशय स्पष्ट आणि पारदर्शी व लोकहिताचे आहे.

मी भाजप पक्षात जाताना कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलेलं नाही. व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष सोडलेला नाही. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतक यांचा सल्ला घेऊनच निर्णय घेतला आहे. जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी हा आपला मुख्य उद्देश आहे.

Vaishali Suryavanshi, MLA Kishor Patil
India vs Pakistan Cricket : ट्रम्प यांची धमकी की भाजप सदस्यांची पैशांची उलाढाल? थेट PM मोदींना पत्र लिहित संजय राऊतांचा सवाल

आमदार किशोर पाटील यांना टार्गेट करताना त्यांनी, मी ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स यांना घाबरून पक्षांतर केलेली नाही. आमचे व्यवहार आणि व्यवसाय अत्यंत पारदर्शक आहे. त्यामुळे कोणाला घाबरून किंवा दबावाला बळी पडून मी पक्षांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, मधुकर काटे, गोविंद शेलार, नंदू सोमवंशी, बन्सी पाटील, सदाशिव पाटील, योजना पाटील, कांतीलाल जैन हे भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्यामुळे सूर्यवंशी यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. त्यातून आगामी राजकारणाची दिशाही स्पष्ट झाली आहे.

Vaishali Suryavanshi, MLA Kishor Patil
Beed Death Case : बीडमध्ये चाललंय काय? आधी सरकारी वकिलाची आत्महत्या अन् आता 25 वर्षीय श्रीनाथ कराडने संपवलं आयुष्य

वैशाली सूर्यवंशी आणि आमदार किशोर पाटील यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ जोरात आहे. आगामी काळात सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांमध्येच चुरस असेल हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना भाजपकडून आगामी काळात नवी आव्हाने दिली जातील हे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com