Imran Khan
Imran Khan Sarkarnama
देश

सभेच्या आधीच इम्रान खान यांना धक्का; मित्रपक्षानं उचललं मोठं पाऊल

सरकारनामा ब्युरो

इस्लामाबाद : पाकिस्तानात (Pakistan) लष्कराच्या मदतीने पंतप्रधान बनलेल्या इम्रान खान (Imran Khan) यांना रविवारी जोरदार झटका बसला. विरोधकांनी आणलेल्या विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याआधी त्यांनी पक्षाच्या जंगी सभेचे आयोजन केलं आहे. पण त्याआधीच त्यांच्या मित्रपक्षाने जोरदार धक्का देत त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे इम्रान खान यांना आता पायउतार व्हावे लागणार असल्याचे चर्चेनं जोर धरला आहे. (Imran Khan News Update)

इम्रान खान सरकारमधील कॅबिनेट मंत्री शाहजान बुग्ती (Shahjan Bugti) यांनी राजीनामा दिला आहे. बुग्ती हे बलूचिस्तानमधील जम्हूरी वतन पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी रविवारी पाकिस्तान पीपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) जरदारी यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने अन्य विरोधी पक्षांतील नेत्यांकडे खान यांच्या विरोधातली प्रस्तावावर समर्थन मागितले होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बुग्ती म्हणाले की, सध्याच्या सरकारने बलूचिस्तानमधील लोकांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे इम्रान खान सरकारचा पाठिंबा मागे घेतला आहे, तसेच मंत्रिपदाचाही राजीनामा दिला आहे. मी आता पीडीएमसोबत असेल, असे त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, इम्रान आणि लष्करातील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर आता लष्करानेही इम्रानची सोबत सोडली असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इम्रान यांना ओआयसीच्या बैठकीनंतर राजीनामा देण्यास सांगितले आहे.

लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (kamar bajwa) यांनी शनिवारी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली. बाजवा यांनी इम्रान यांना देशाला संघर्ष आणि हिंसाचाराच्या मार्गावर नेण्यापासून दूर राहण्यास सांगितले. देशातील महागाई, स्वकीय खासदारांचे बंड आणि विरोधी पक्षाच्या राजकारण आदी कारणामुळे इम्रान खान यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. त्याआधी त्यांनी रविवारी पक्षाच्या सभेचं आयोजन केलं आहे.

राजकारणापासून तटस्थपणे दिसणारे पाकिस्तानी लष्कर अचानक पहिल्यांदाच सक्रिय झाले आहेत. इम्रानच्या पक्षाच्या सदस्यांनी सिंध हाऊसवर केलेल्या हल्ल्यावर लष्करप्रमुखांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाजवा यांनी खान यांना खुर्ची सोडण्यास सांगून त्यांच्या जागी त्यांच्याच पक्षाचा दुसरा नेता पंतप्रधान म्हणून नियुक्त करावा, असे म्हटले आहे. इम्रान यांनी जनरल बाजवा आणि गुप्तचर अधिकारी लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांची भेट घेतली होती. यानंतर बाजवा आणि तीन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी इम्रान यांना राजीनामा देण्यास सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT