Mallikarjun Kharge Sarkarnama
देश

Mallikarjun Kharge : जब तक मोदी को नहीं हटाएँगे... मैं ज़िंदा रहूँगा! भाषण सुरू असताना खर्गेंची तब्येत बिघडली...

Rajanand More

Srinagar : जम्मू आणि काश्मीरमधील एका प्रचारसभेदरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची प्रकृती अचानक बिघडली. व्यासपीठावर भाषण सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे काही मिनिटे त्यांना भाषण थांबवावे लागले.

खर्गे यांची रविवारी जम्मूमधील कठूआ येथे सभा झाली. काहीवेळ जोरदार भाषण केल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे व्यासपीठावरील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचे हात पकडले. अशा स्थितीत त्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. पण नंतर त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नसल्याने त्यांनी खुर्चीवर बसवण्यात आले.

काही मिनिटे आराम केल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरूवात केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले. ते म्हणाले, मी 83 वर्षांचा आहे. एवढ्यात मरणार नाही. जोपर्यंत मोदींना सत्तेतून हटवत नाही, तोपर्यंत मी जिवंत राहीन.

दरम्यान, या भाषणादरम्यान खर्गे यांनी सरकारवरही जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, हे लोक इथे कधीच निवडणूक घेऊ इच्छित नव्हते. त्यांना हवे असते तर एक-दोन वर्षांतच निवडणूक घेतली असतो. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांना नायब राज्यपालांच्या माध्यमातून ते रिमोट कंट्रोल सरकार चालवायचे होते.   

पंतप्रधानांनी मागील दहा वर्षात देशातील युवकांसाठी काहीही केले नाही. मागील दहा वर्षात तुमचा विकास परत न आणू शकलेल्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का, असा सवाल खर्गेंनी उपस्थितांना केला. तुमच्यासमोर कुणी भाजपचा नेता आला तर त्यांनी विकास आणला की नाही, हे विचारा, असे आवाहनही खर्गेंनी यावेळी केली.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील 40 जागांसाठी दोन दिवसांनी मतदान होणार आहे. प्रचारासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी शेवटच्या दिवशी अनेक भागात प्रचारसभा व रॅलीचे आयोजन केले होते. 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT