Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीचा एकच टप्पा, दिवाळीनंतर निकालाचा धमाका; असा असेल आयोगाचा प्लॅन

Election Commission Political News Election Schedule : निवडणूक आयोगाच्या टीमने नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. त्यामुळे पुढील काही दिवसांत वेळापत्रक जाहीर होईल, हे स्पष्ट आहे.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

 Mumbai : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी होणार, याची उत्सुकता राजकीय पक्षांप्रमाणेच मतदारांनाही लागली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या टीमने दोन दिवसांचा राज्याचा दौरा केला आणि आता ती वेळ जवळ आल्याचे स्पष्ट झाले. मागील दोन विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम पाहता यावेळीही एकाच टप्प्यात निवडणूक होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्याआधी निवडणूक आयोगाला निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. आयोगाकडून पुढील 10-12 दिवसांत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात.  

Maharashtra Assembly Election 2024
Sharad Pawar: हर्षवर्धन पाटलांच्या अडचणी वाढल्या? इंदापुरात तुतारी कोण फुंकणार; शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं...

2014 मध्ये विधानसभेचा कार्यकाळ 8 नोव्हेंबरला संपणार होता. त्यासाठी आयोगाने 20 सप्टेंबरला नोटिफिकेशन जारी केले होते. 15 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते.

2019 मध्ये 27 सप्टेंबरला नोटीफिकेशन जारी करण्यात आले. तर 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले. मागील दोन्ही वर्षी जेमतेम 27-28 दिवसांत निवडणुका आटोपल्या होत्या. 2024 मध्ये विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपत असल्याने त्याआधी काही दिवस निवडणुकांचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024
Schools in Maharashtra : आता शाळाही अदानींकडे; केसरकर म्हणतात, त्यात चुकीचे काय?

सध्या आयोगाकडे उरलेले दिवस कमी असल्याने एकाच टप्प्यात निवडणूक घेतली जाईल असे स्पष्ट आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नोटीफिकेशन जारी होईल. याच महिन्याच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी आहे. शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असतील. या सुटीच्या कालावधी मतदानाची तारीख नसेल. सुट्ट्यानंतरच म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकते. त्यानंतर दोन-तीन दिवसांत निकाल जाहीर करण्यात येईल, असे नियोजन निवडणूक आयोगाकडून केले जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com