Omar Abdullah, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Omar Abdullah Vs Rahul Gandhi : मतदानादिवशीच अब्दुल्ला राहुल गांधींवर भडकले; म्हणाले, दुर्दैवाने अपेक्षित..!

Jammu and Kashmir Assembly Election Congress National Conference : जम्मू आणि काश्मीरमध्ये बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यात आणखी एक टप्पा आहे.

Rajanand More

New Delhi : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पण ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या प्रमुख आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू असतानाच एनसीचे कार्याध्यक्ष ओमर अब्दुल्लांनी थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.  

राज्यात 2014 नंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाने एकला चलोची भूमिका घेतली आहे. तर काँग्रेस आणि एनसीने आघाडी करत विरोधकांसमोर आव्हान उभे केले आहे. पण या आघाडीत ताळमेळ नसल्याचे खुद्द नेत्यांनीच मान्य केले आहे.

मतदानादिवशी मीडियाशी बोलताना ओमर अब्दुल्लांनी आपली नाराजी बोलून दाखवली. ते स्वत: दोन मतदारसंघात उमेदवार आहेत. अब्दुल्ला म्हणाले, काश्मीरमधील एक-दोन जागांवरील प्रचार संपल्यानंतर राहुल गांधी जम्मूवर लक्ष देतील, अशी आशा आहे. काँग्रेसने काश्मीरमध्ये काय केले हे महत्वाचे नाही, जम्मूमध्ये काय केले हे महत्वाचे आहे.  

दुर्दैवाने काँग्रेसने जम्मूमध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे फारसे काही केलेले नाही. आघाडीमध्ये जम्मूत काँग्रेसकडे सर्वाधिक जागा आहेत. पण अजूनही जम्मूत काँगेसचा प्रचार अपेक्षेप्रमाणे सुरू झालेला नाही. आता केवळ पाच दिवस उरले आहेत. मला आशा आहे की, राहुल यांनी काश्मीरमधील एका जागेवरील प्रचार संपवल्यानंतर काँग्रेसचे सर्व लक्ष जम्मूकडे राहील, असा टोलाही अब्दुल्ला यांनी लगावला आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज सहा जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात 25.78 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबरला 7 जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांसाठी मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील 26 जांगापैकी 15 जागा मध्य-काश्मीरमधील आणि 11 जागा जम्मूमधील आहेत. मतदारांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT