New Delhi : म्हैसूर शहरी विकास प्राधिकरणातील कथित भूखंड घोटाळाप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना दिलासा मिळाला नाही. या प्रकरणात खटला चालवण्यासा राज्यपालांनी दिलेल्या मंजुरीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सिध्दरामय्या यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
हायकोर्टाने सिध्दरामय्या यांच्याविरोधात निकाल देताच भाजपसह इतर विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली आहे. काँग्रेसमधील नेत्यांनी मात्र सिध्दरामय्या यांना भाजपकडून गोवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.
सिध्दरामय्या यांनीही कोर्टाच्या निकालानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याविरोधात राजकीय षडयंत्रला घाबरत नाही. कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर पुढे कोणते पाऊल उचलायचे, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप मनी पॉवर आणि ऑपरेशन कमळच्या माध्यमातून आपले सरकार अस्थिर करू पाहत आहे. पण पक्षातील सर्व आमदार आपल्या पाठिशी असल्याने त्यांना यश मिळणार नाही, असा विश्वास सिध्दरामय्या यांनी व्यक्त केला. भाजप आणि जेडीएसच्या षडयंत्राला न घाबरता आम्ही सामोरे जाऊ. आम्हाला लोकांनी आशीर्वाद दिला आहे. मला पक्षश्रेष्ठी आणि नेत्यांचाही पाठिंबा असल्याचे सांगत सिध्दरामय्या यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही सिध्दरामय्या यांच्या राजीनाम्याची शक्यात फेटाळून लावली आहे. काँग्रेस त्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिध्दरामय्या यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर पडदा पडला आहे.
दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर कथिक भूखंड घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ईडीकडून अटक करण्यात आली होती. अटकेआधी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी जेलमधून जामीनावर सुटका झाल्यानंतर राजीनामा दिला.
सिध्दरामय्या यांच्यावरही भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्यपालांनी मंजूरी दिली आहे. भाजपकडून सीबीआय चौकशीचीही मागणी होत आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यास सिध्दरामय्या यांच्या अडचणी वाढू शकतात. सीबीआयपाठोपाठ यामध्ये ईडीचीही एन्ट्री होऊ शकते. त्यामुळे सोरेन, केजरीवालांनंतर आता सिध्दरामय्यांचा नंबर लागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.