Supreme Court, Delhi
Supreme Court, Delhi  Sarkarnama
देश

BJP News : मोठी बातमी : भाजपला दिलासा ; 'या' राज्यात विधानसभा निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा

सरकारनामा ब्युरो

Jammu Kashmir Delimitation Commission Petition : जम्मू-काश्मीर येथे विधानसभा निवडणुक घेण्यासाठी सीमा निश्चित करणे गरजेचे आहे. पण याला अनेक जणांनी विरोध केला आहे.

मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयाकडून मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे.

आज (सोमवारी) या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने आजच्या सुनावणीत ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हाजी अब्दुल गनी खान आणि मोहम्मद अयूब मट्टू यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांना सीमा निश्चित करण्यासाठी नेमलेल्या आयोगाला विरोध केला होता.

आयोगाने २००४ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार,सर्व राज्यात, केंद्र शासित प्रदेशात विधानसभांच्या जागाची संख्येत वाढ करता येत नसल्याचे स्पष्ट केले होते. २०१६ नंतर सीमा निश्चित कराव्यात असे या याचिर्केत म्हटलं होते. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपुर, नागालॅड येथे गेल्या ५१ वर्षांपासून सीमा निश्चित झालेल्या नाही.

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुक घेण्यापूर्वी या सीमा निश्चित झाल्या पाहिजे, असे विविध पक्षांचे मत आहे. त्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

विधानसभा आणि लोकसभा सीमा निश्चित करण्याच्या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्याने भाजप नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

2014 च्या आकडेवारीनुसार जम्मू काश्मीर राज्यात एकूण 78,50,852 मतदार आहेत. यात पुरुष मतदार 41,09,804, महिला मतदार 37,40,709 आणि अन्य मतदार 339 आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT