Girish Mahajan News: अनिल देशमुखांना भाजपमध्ये यायचे होते : गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: सरकार पाडा, असा प्रस्ताव कुणीही दिलेला नाही. अनिल देशमुख यांची तेवढी ताकद आहे का?
Girish Mahajan-Ajit Pawar-Anil Deshmukh
Girish Mahajan-Ajit Pawar-Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: तुरुंगात असताना मला एक ऑफर आली होती, ती स्वीकारली असती तर अडीच वर्षांपूर्वीच ठाकरे सरकार कोसळले असते, असे विधान माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी नागपुरात बोलताना केले होते. त्याला भाजपचे नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan') यांनी गौप्यस्फोट करत उत्तर दिले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मला भाजपमध्ये घ्या, अशी विनंती देशमुखांनी केली होती, असे महाजन यांनी पलटवार करत म्हटले आहे. (Anil Deshmukh wanted to join BJP : Girish Mahajan's secret blast)

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मला नाही वाटत की अनिल देशमुख यांना कुठलाही प्रस्ताव दिलेला नव्हता. उलट विधानसभा निवडणुकीपूर्वी मला भाजपमध्ये घ्या, अशी विनंती त्यांनी कितीवेळा केली हेाती. आम्हाला किती विनवण्या केल्या होत्या, तेही त्यांना विचारा. सुदैवाने राष्ट्रवादीकडून निवडून आले आहेत. झालेल्या गोष्टींवर बोलू नये. आता आपली चौकशी सुरू आहे. आता आपण जामिनावर आहात. जसजशी चौकशी होईल, तशी आपली कागदपत्रे, असे म्हणणे ईडीपुढे ठेवा, असा सल्लाही महाजनांनी देशमुख यांना दिला.

Girish Mahajan-Ajit Pawar-Anil Deshmukh
Ajit Pawar News: उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घ्या : अजित पवारांनी केले शिवसैनिकांना चार्ज

सरकार पाडा, असा प्रस्ताव कुणीही दिलेला नाही. अनिल देशमुख यांची तेवढी ताकद आहे का?, त्यांना म्हटल्यावर ते सरकार पाडतील का?. याचं त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं. भाजपमध्ये येणाऱ्याच्या रांगेत देशमुख होते. मात्र, आम्ही त्यांना नाकारलं. सुदैवाने राष्ट्रवादीकडून निवडून आले आहेत. त्यांना गृहखातं मिळालं. मात्र, त्यांना त्या पदावर काम करता आलं नाही, असेही महाजन म्हणाले.

Girish Mahajan-Ajit Pawar-Anil Deshmukh
Rohit Pawar News : शिंदे-फडणवीस सरकार बदला घेण्यासाठी सत्तेवर बसलंय : रोहित पवारांचा घाणाघात

‘अजित पवारांना तो अधिकार नाही’

दरम्यान गद्दारीवरून शिंदे गटावर टिका करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर महाजन यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, अजितदादा, बंडखोरांची चिंता तुम्ही करू नका. कारण पहाटे पहाटे तुम्ही आमच्यासोबत शपथ घेतली आहे. त्यामुळे तो म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही सकाळी सकाळी आला होता, त्यावेळी मी तुमच्यासोबत होतो. शिंदे गटाचे ५० लोकं आमच्यासेाबत आले आहेत. ते सगळे निवडून येतील, याची काळजी आम्ही निश्चितपणे घेऊ.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com