Jammu Kashmir Elections Sarkarnama
देश

Jammu Kashmir Elections: जम्मू काश्मीरमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कुठल्या पक्षाचा? सरासरी संपत्ती तीन कोटी

सरकारनामा ब्यूरो

Jammu Kashmir Election: जम्मू काश्मीर होत असलेली विधानसभा निवडणूक अनेक बाबतीत विशेष ठरणार आहे. 10 वर्षांनंतर येथे विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत कलम 370 या प्रमुख मुद्दा आहे. जम्मू काश्मीर येथे गेल्या वर्षांपासून दहशतवादी कारवायाला मोदी सरकारने लगाम लावला आहे. या विधानसभा निवडणुकीत महिला मतदार अधिक आहेत. त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत.

पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांची सरासरी संपत्ती ही तीन कोटी रुपये आहे. यात 50 टक्के उमेदवार हे करोडपती आहेत, यात पीडीसीचे उमेदवार सर्वाधिक आहेत. 13 उमेदवारांकडे 10 कोटी पेक्षा अधिक संपत्ती आहे. 219 उमेदवारांमध्ये फक्त नऊ महिला आहेत. जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फ्रेंस (जेकेएनसी) च्या 16 ते 18 उमेदवारांची संपत्ती 1 कोटी रुपये आहे. भाजपच्या 16 उमेदवार हे करोडपती आहेत.

काँग्रेसच्या 9 उमेदवारांपैकी 8 उमेदवार हे करोडपती आहेत. आम आदमी पक्षाचे 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांची संपत्ती १ कोटी रुपये आहे.जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत, त्यापैकी 47 खोऱ्यात आणि 43 जम्मू विभागात आहेत. राज्यात 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून शुक्रवारी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमध्ये कलम 370 आता इतिहासजमा झाले असून ते पुन्हा कधीच येणार नाही, असे ठणकावून सांगितले. शेवटची विधानसभा निवडणूक 2014 मध्ये झाली होती 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर भाजप आणि पीडीपीने युतीचे सरकार स्थापन केले होते. 2018 मध्ये युती तुटल्यानंतर सरकार पडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT