MIDC ला जमीन देण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्याची शिंदे सरकारनं केली उचलबांगडी? काय आहे प्रकरण...VIDEO पाहा

Kaustubh Divegaonkar Transfer News: गोकूळ मिशनचे प्रकल्प सुरु असल्याने ही जमीन देता येणार नाही, असे सांगत त्यांनी जमीन देण्यास विरोध केल्याने त्यांची सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने उचलबांगडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पशुसंवर्धन खात्याची जमीन एमआयडीसीला देण्यास विरोध केल्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांची महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

गुरुवारी अपर मुख्य सचिव (सेवा)व्ही.राधा यांनी दिवेगावकर यांच्या बदलीचा आदेश काढला आहे.त्यांच्या जागेवर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेल्या ताथवडे – थेरगाव येथील ७१.९८ हेक्टर जमिनीपैकी ६६.३० हेक्टर जमिनीची एमआयडीसीने मागितली होती. पण गोकूळ मिशनचे प्रकल्प सुरु असल्याने ही जमीन देता येणार नाही, असे सांगत त्यांनी जमीन देण्यास विरोध केल्याने त्यांची सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने उचलबांगडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत विविध प्रकल्प या जमिनीवर सुरू असल्यामुळे या जमिनीची पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाला गरज असल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाकडून राज्य सरकारला देण्यात आला होता, अशी माहिती आहे. अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
CM Shinde Video : मुख्यमंत्री शिंदेंसमोर मोठा पेच; कुठली तीन नावे राज्यपालांकडे पाठवणार

दुर्गम भागात गोदाम विषयक पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर पूर्व क्षेत्रातील केंद्र शासित प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि अंदमान निकोबार द्वीप समूह अशा एकूण चार ठिकाणांवर १६७०४ टन क्षमतेच्या गोदामांची निर्मिती करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळासोबत केंद्रीय वखार महामंडळाने करारावर सह्या केल्या आहेत.केंद्रीय वखार महामंडळाची देशात सुमारे ४६५ हून अधिक गोदामांची साखळी असून गोदामविषयक विविध सेवा दिल्या जातात.

केंद्रीय वखार महामंडळाने सन २०२५ पर्यन्त वखार महामंडळाच्या प्रगतीच्या दृष्टीने रणनीती तयार केलेली आहे. त्यातील काही घटकांची आपण माहिती घेतली आहे. समाजाच्या दृष्टीने सुरक्षित गोदाम व्यवस्थापन,पर्यावरणास अनुकूल, विश्वसनीय, किफायतशीर, मूल्यवर्धन करणारी गोदाम व्यवस्था याबरोबरच एकीकृत गोदाम आणि लॉजेस्टिक सुविधा निर्माण करून ग्राहकांना समाधानकारक गोदामविषयक सेवा पुरविणे असा उद्देश ठेवून केंद्रीय वखार महामंडळाने व्हीजन २०२५ ची निर्मिती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com