Jammu Kashmir Election Sarkarnama
देश

Jammu Kashmir Election : जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर मतदान; पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी रांगाच रांगा

Voters queue up for the first phase of polling in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदारांच्या मतदारसंघाबाहेर रांगा लागल्या आहेत.

Pradeep Pendhare

Jammu Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पहिल्यात टप्प्यात 90 पैकी 24 जागांसाठी होत असलेल्या मतदानासाठी मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. 24 जागांमध्ये 16 जागा काश्मीर खोऱ्यात, तर आठ जागा जम्मू विभागात आहेत.

केंद्रातील भाजप (BJP) सरकारने जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे. आज पहिल्या टप्प्यात 23.27 लाखांहून अधिक मतदार असून, यात 11.76 लाख पुरूष, तर 11.51 लाख महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये चार महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. विधानसभा निवडणुकीसाठी शांतेतत मतदान (Voting) होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पहिल्यात टप्प्यात होत असलेल्या मतदानासाठी केंद्र सरकारने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षामध्ये लढत दिसते. हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय पातळवर इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची आघाडी आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने आपपाली ताकद जम्मू-काश्मीरमध्ये उतरवलीय. या प्रमुख पक्षांसह जम्मू-काश्मीरमध्ये लहान पक्ष, संघटना यांचा देखील निवडणुकीवर प्रभाव दिसतो. जमात-ए-इस्लाम आणि अवामी इत्तेहाद पक्षाने ऐनवेळेला निवडणुकीत युती केली आहे.

भाजपचं लहान पक्षांना बळ?

भाजपने इथं ताकद दाखवण्यासाठी बहुतांशी जागांवर उमेदवार दिले आहेत. भाजपने काश्मीर खोऱ्यातील 47 पैकी 19 मतदारसंघामध्ये उमेदवार दिले आहेत. एआयपीसारखे लहान पक्ष आणि अपक्ष भाजपशी संधान बांधून असल्याचा आरोप या निवडणुकीत होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

जम्मू-काश्मीरमधील मतदानाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्सुकता दाखवला. लोकशाही उत्सव अधिक मजबूत होत आहे. या निवडणुकीत मतदानासाठी पुढाकार घ्या, विशेष करून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवक-युवतींनी मतदानासाठी पुढाकार घेऊन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT