Mallikarjun Kharge : पीएम मोदींना मल्लिकार्जुन खरगेंचे पत्र; राहुल गांधींची जीभ कापण्याच्या विधानाचा उल्लेख...

Mallikarjun Kharge letter to Prime Minister Narendra Modi on which issue : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देणारे पत्र लिहिलं.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देताना राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात देशातील राजकीय परिस्थिरीवर भाष्य करण्याबरोबर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी निगडीत अनेक हिंसात्मक विधानं आणि संवेदनशील मुद्यांवर लक्ष वेधलं.

काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधानांना शुभेच्छा देत असतानाच, दुसरीकडं काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींची वाढदिवशी 'राष्ट्रीय बेरोजगार दिन' म्हणून साजरा करत आहेत.

मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा देताना म्हटलं की, देशातील संविधान आणि लोकशाहीच्या मुद्यावर लक्ष वेधलं. याशिवाय लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप महायुतीमधील मित्रपक्ष दिवसेंदिवस चिथावणीखोर, हिंसक आणि अपमानास्पद विधान करत आहेत. उत्तर प्रदेश आणि दिल्लीमधील भाजप (BJP) नेते, तर महाराष्ट्रातील भाजप महायुतीमधील मित्र पक्षाचे आमदार राहुल गांधींविरुद्ध चिथावणीखोर भाषा वापरत असल्याकडे मल्लिकार्जुन खरगेंनी लक्ष वेधलं.

Mallikarjun Kharge
PM Modi Birthday : 'राष्ट्रीय बेरोजगार दिन' म्हणून साजरा; काँग्रेसकडून बेरोजगारीचा आकडा जाहीर

मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या पत्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना गटाच्या आमदारांने काँग्रेसचे राहुल गांधी यांच्याविषयी जीभ कापण्याच्या विधानाचा उल्लेख केलाय. 'एक नंबर आंतकवादी', 'जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपये बक्षीस देणार' आणि 'तुझी तुझ्या आजीसारखी स्थिती करू', अशी धमकी देणारी विधानांचा संदर्भ देत मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधलं.

Mallikarjun Kharge
Swati Maliwal News : आतिशींची मुख्यमंत्रिपदी निवड होताच, स्वाती मालिवाल यांनी साधला निशाणा, म्हणाल्या..

देशाची अहिंसा ही ओळख पसू नका

राहुल गांधी यांच्याविषयी वापरण्यात येणारी हिंसेच्या भाषेवर चिंता व्यक्त करताना देशाच्या संस्कृतीला शोभणारी नसल्याचं सांगत देशाची संस्कृती अहिंसा, सद्भभाव आणि प्रेम यासाठी ओळखली जाते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सन्मानजनक असहकाराचा इतिहास राहिला आहे. अशात सत्ताधारी आणि विरोधकांनी देशाची प्रतिष्ठाच वाढवली आहे. परंतु भाजप महायुतीमधील मित्रपक्ष अलीकडच्या काळात राहुल गांधींच्याविषयी वापरत असलेल्या भाषा चिंताजनक आहे. यातूनच समाजविघातक प्रवृत्तींमुळे महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना देशासाठी शहीद व्हाव लागलं. सत्ताधाऱ्यांचे हे राजकारण लोकशाहीसाठी अनिष्ट प्रथा निर्माण करणार असल्याकडे मल्लिकार्जुन खरगे यांनी लक्ष वेधलं.

भडकावू विधान करणाऱ्या नेत्यांना चाप लावा

मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्राच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजप पक्षामधील नेत्यांना चांगले अनुशासन आणि मर्यादा पाळायला शिकवा, तसंच राजकारणामधील सन्मान काय असता, यावर मार्गदर्शन करण्याची मागणी केली. याशिवाय आतापर्यंत राहुल गांधींच्या विरोधात करण्यात आलेल्या हिंसात्मक विधानांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. यातून राजकारणाचा खालवत चाललेली परिस्थिती सुधारेल, असे म्हणत भडकावू विधान करणाऱ्या नेत्यांना चाप लावला जाईल, अशी अपेक्षाही मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com