Irom Sharmila, Mahatma Gandhi, Bhagat Singh and Sonam Wangchuk are among the prominent personalities associated with historic hunger strikes in India. Sarkarnama
देश

Abhijeet Dipke Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर धडकी भरवणारी गर्दी; सरकारही अ‍ॅक्शन मोडवर; तब्बल 5 हजार जवान...

Jantar Mantar protest security arrangements: सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून ट्विट करत म्हटले आहे की, सरकारने जर आमच्या तीन अटी मान्य केल्या तर आम्ही आंदोलन मागे घेण्यास तयार आहोत.

Roshan More

Abhijeet Dipke protest march latest updates : सोनम वांगचुक यांन दोन दिवसांपूर्वी जंतर मंतर येथून हटवून रुग्णालयात दाखल केले. मात्र, तरी देखील सीजेपीकडून सुरु असलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. आज संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे काल रात्रीपासूनच जंतर मतंरकडे येणाऱ्या लोकांची गर्दी वाढत आहे. पहाटे देखील मोठ्या संख्येने लोक येथे दाखल होत होते.

मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर परिसरात तब्बल 5 हजार जवान तैनात करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले की, या मोर्च्याला परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच आमच्याकडे परवानगीचा अर्ज देखील आला नव्हता. पोलिसांनी कलम 163 लागू करत मोर्चे, आंदोलन यांना बंदी केली आहे.

पोलिसांनी बंदी घातली असली तरी मोर्चा निघणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा मोर्चा जंतर मंतरपासून एक किलोमीटरवर असणाऱ्या केरळ भवन येथे थांबला जाण्याची माहिती आहे. जर, मोर्चाला परवानगी मागितली तर ती केरळ भवन पर्यंत देण्यात येणार आहे, असे सांगितले जात आहेत.

सोनम वांगचुक यांच्या तीन अटी

सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून ट्विट करत म्हटले आहे की, सरकारने जर आमच्या तीन अटी मान्य केल्या तर आम्ही आंदोलन मागे घेण्यास तयार आहोत. त्यामध्ये नीट परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, मला आणि सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना संसदेपर्यंत जाऊ देण्यात आले आणि तेथील खासदारांनी आम्हाला नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले तर मी आमरण उपोषण मागे घ्यायला तयार आहे.

तसेच त्यांच्या तिसऱ्या अटीमध्ये म्हटले आहे की, जर माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला संसदेत जाता आले नाही तर खासदार आणि अन्य नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात येऊन मला वरील सर्व गोष्टींबाबत आश्वासन द्यावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT