CJP Parliament March : संसदेवरील मोर्चाआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक, अभिजीत दीपकेंना धक्का, 'त्या' अटीमुळे आंदोलकांची कोंडी

Abhijeet Dipke Jantar Mantar protest : जंतरमंतर येथून आंदोलकांना बाहेर पडण्याची परवानगीही पोलिसांनी दिलेली नाही. त्यामुळे जंतरमंतर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
CJP Abhijeet Dipke
CJP Abhijeet DipkeSarkarnama
Published on
Updated on

Navi Delhi News, 20 Jul : नीट (NEET) परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीकडून गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके करत आहेत.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज (२० जुलै) संसदेवर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी केवळ केरळ भवनापर्यंतच परवानगी दिली जणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

पोलिसांनी जंतरमंतर येथून आंदोलकांना बाहेर पडण्याची परवानगीही पोलिसांनी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. तर सध्या जंतरमंतर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

CJP Abhijeet Dipke
Jalgaon Politics: अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरून महायुतीत ठिणगी: शिवसेनेचे किशोर पाटील यांची आमदारकी सोडण्याची तयारी

पोलिसांनी नियम मोडून मोर्चात सहभागी होणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, देशाच्या विविध राज्यांतून हजारो कार्यकर्ते आणि विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

CJP Abhijeet Dipke
Balasaheb Thorat Crime : श्रीरामपूरच्या वाढत्या गुन्हेगारीवर बाळासाहेब थोरातांची तीव्र चिंता; 'मुख्यमंत्र्यांना पत्र धाडणार', पाळेमुळे सांगणार?

त्यामुळे पोलिसांच्या निर्बंधांनंतरही आंदोलक संसदेकडे कूच करणार की जंतरमंतरवरच आंदोलन सुरू ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके पुढे कोणती भूमिका घेणार आणि आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे राजकीय वर्तुळासह देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com