Jantar Mantar Protest Violence FIR Police Sarkarnama
देश

CJP Protest Violence : मोठी बातमी! जंतर-मंतरवरील हिंसाचारामागे 'हे' तीन पक्ष; गुन्हा दाखल! विद्यार्थी निर्दोष

Jantar Mantar Protest Violence FIR Police : सीजेपीने संसदेवर काढलेल्या मोर्चात हिंसाचार झाला होता. पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. मात्र, हा हिंसाचार भडकवण्यामागे राजकीय पक्ष असल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.

Roshan More

CJP Protest News : जंतर-मंतरवर काॅक्रोज जनता पार्टी (सीजेपी) आंदोलन करत होती. या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सीजेपीने संसदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चात हिंसाचार झाला.

हा हिंसाचारामागे विद्यार्थी नव्हते तर राजकीय पक्षांचा डाव होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या विषयी सुत्रांच्या हवाल्याने 'जागरण' या हिंदी वेबसाईटने वृत्त दिलेल आहे.

वृत्तात म्हटले आहे की, संसद मार्गावर निघालेल्या मोर्चात हिंसाचार झाला. या बाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये या हिंसाचाराचा ठपका, आम आदमी पार्टी, भीम आर्मी आणि समाजवादी पक्ष या तीन राजकीय पक्षांवर ठेवण्यात आला आहे.

या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संशयित कार्यकर्त्यांचा जबाब देखील पोलिस नोंदवणार आहेत. संसद मार्गावर मोर्चा दरम्यान जो हिंसाचार झाला त्याबाबत पोलिस अधिकारी इंद्रजित यांनी एफआयआर दिली होती.

आता या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलिस अधिकारी दिनेश कुमार करत आहेत. एफआयआरनुसार संसदे मार्गावरील हिंसा ही सुनियोजित कटाचा भाग होती.

FIR मध्ये नेमकं काय?

FIR मध्ये उल्लेख आहे की, 20 जुलैला सीजेपीच्या आवाहनानंतर विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चात काही समाजकंटक देखील सहभागी झाले होते. त्यांनी सुरक्षारक्षकांवर लाठ्या चालवल्या, दगड मारले, त्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि गोंधळ घातला. त्यामुळे हत्येचा प्रयत्न,दंगल भडकवणे, विना परवानगी मोर्चा, सभा तसेच आर्म्स अॅक्ट या विविध कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT