Rahul Gandhi, Prime Minister Narendra Modi Sarkarnama
देश

Jayram Ramesh : 'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधींशी संवाद साधणाऱ्यांमागे 'IB'च्या चौकशीचा ससेमिरा!

सरकारनामा ब्यूरो

Jayram Ramesh On Bharat Jodo Yatra : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारीपासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा आता दिल्लीत येऊन धडकली आहे. आणि गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाचा धसका मोदी सरकारने घेतल्याची देखील चर्चा जोर धरु लागली आहे. याचदरम्यान आता काँग्रेस नेते जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी मोदी सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा शनिवारी (दि.24) दिल्लीत दाखल झाली आहे. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा व नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, दाक्षिणात्य सुपरस्टार व नेते कमल हसन यांच्यासह अनेक वरिष्ठ नेतेमंडळी यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा व नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेतेमंडळी यात्रेत सहभागी झाले होते. दिल्लीत दाखल झाल्यानंतर काँग्रेसकडून मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

राहुल गांधी यांच्याशी भारत जोडो यात्रेदरम्यान संवाद साधणाऱ्या अनेकांच्या पाठीमागे आयबीच्या चौकशीचा ससेमिरा लावण्यात येत आहे. असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे. यासंबंधीचे टि्वट रमेश यांनी केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश ट्विटमध्ये म्हणतात, भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवाद साधणाऱ्या अनेकांची आयबीकडून चौकशी करण्यात येत आहे.

गुप्तहेरांकडून सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यांना सादर केलेल्या निवेदनाच्या प्रतींची मागणी देखील केली जात आहे. या भेटीबद्दल काहीही गुप्तता नाही, परंतु, स्पष्टपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह घाबरले आहेत असेही काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले आहेत.

मोदी सरकारकडून द्वेषाचे राजकारण

मीडियामध्ये आता हिंदू-मुस्लिम,हिंदू-मुस्लिम दाखवले जाते. याच्या माध्यमातून द्वेषाचे राजकारण केले जाते. मात्र यामध्ये माध्यमांचा दोष नाही तर त्यांच्यामागे त्यांचे मालक आहेत, ही त्यांची ताकद आहे. मी २,८०० किलोमीटर प्रवास केला आहे व यादरम्यान लाखो लोकांना भेटलो आहे. हे लोक एकमेकांवर प्रेम करतात एकमेकांचा द्वेष करत नाहीत, मात्र माध्यमात हे दाखवले जात नाही. २४ तास माध्यमांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करून लोकांचे लक्ष विचलित केले जाते.

जनतेचा पैसा या मालकांच्या खिशात घातला जातो.हे नरेंद्र मोदींचे सरकार नाही तर अदानी-अंबानीचे सरकार आहे हे जनतेला समजले आहे अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT