Ajit Pawar : राष्ट्रवादीत अजित पवारांची घुसमट, शिंदे गटातील नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ

Ajit Pawar : अजित पवार हे आमच्या सगळ्यांच्याबरोबर आले तर आनंदच होईल.
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Deepak Kesarkar big statement on Ajit Pawar : हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीचा किल्ला कधी आक्रमक तर कधी संयतपणे लढवत सत्ताधार्यांना कोंडीत पकडण्याचं काम अजित पवार हे चोखपणे बजावत आहे. त्यांच्या प्रश्नांच्या भडिमारामुळे सत्ताधारी मंत्री अनेकदा गोंधळल्याचं देखील पाहायला मिळाले आहे. मात्र, याचदरम्यान शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याने केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Deepak Kesarkar big statement on Ajit Pawar )

अजित पवार हे आमच्या सगळ्यांच्याबरोबर आले तर आनंदच होईल. राष्ट्रवादीत त्यांची घुसमट होतेय हे सर्वांनी बघितलं आहे असं विधान शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. मात्र, केसरकर यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Nitin Gadkari : नितीन गडकरींचं स्वप्न वेळच्या मागे : त्यांच्याच मंत्रालयाच्या कामांना सर्वाधिक विलंब!

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. केसरकर म्हणाले, राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकांची मैत्री असते, एकमेकाचा आदर असतो. अजित पवार एकमेकांच्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखं मोकळेपणाने बोलत असतात. त्यामुळं एखाद्या नेत्यानं तसं वक्तव्य केलं असेल, असं दीपक केसरकर म्हणाले.

Ajit Pawar, Sharad Pawar
Uddhav Thackeray : शिंदे-फडणवीस सरकारने आदित्यची केली कोंडी; उद्धव ठाकरे आपल्या फौजेसह मैदानात

मात्र, अजित पवार हे आमच्या सगळ्यांच्याबरोबर आले तर आनंदच होईल. राष्ट्रवादीत त्यांची घुसमट होते, हे सगळ्यांनी बघितलं आहे. उमदा नेता जर सोबत असेल तर कोणाला आवडणार नाही. त्यामुळे पोटे यांनी तसं विधान केलं असेल असं मत केसरकर यांनी व्यक्त केले.

...तर आज अजित पवार मुख्यमंत्री राहिले असते!

अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित अहिल्यादेवी पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजपाचे आमदार प्रवीण पोटे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. तसेच जर पहिल्या शपथविधीचा वेळ सकाळऐवजी दुपार असती तर आज अजित पवार(Ajit Pawar) मुख्यमंत्री राहिले असते असं वक्तव्य पोटे यांनी केले होते. त्याच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे. खुद्द अजित पवारांनी यावर भाष्य केलेलं नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com