Karnataka Elections 2024 JDS News Sarkarnama
देश

Karnataka Elections 2024 : शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करा, दोन लाख मिळवा ; JDS नेत्याचे अजब विधान ; काय आहे प्रकरण ?

Karnataka Elections 2024 : एचडी कुमारस्वामी यांनी दिलेल्या या अनोख्या आश्वासनानंतर मतदारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Elections 2024 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. प्रचाराची जोरदार तयारी सुरु आहे. मतदारांना प्रभावित करण्यासाठी पक्ष विविध आश्वासने देत आहेत.

कर्नाटक विधानसभा जिंकण्यासाठी जेडीएसने दिलेल्या एका आश्वासनाची सध्या चर्चा आहे. जेडीएसचे नेता, माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी दिलेल्या या अनोख्या आश्वासनानंतर मतदारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एचडी कुमारस्वामी यांची कोलारमध्ये काल (मंगळवारी) 'पंचरत्न रॅली'झाली. या रॅलीत मतदारांशी संवाद साधतांना त्यांनी हे आश्वासन दिले आहे.

ते म्हणाले, "सत्तेत आम्ही आलो तर शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करणाऱ्या युवतीला दोन लाख रुपये देण्यात येतील," हे आश्वासन देण्यामागे कुमारस्वामी यांनी कारण सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नसल्याची एक याचिका दाखल झाली आहे. त्याचा दाखला त्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी आणि या मुलांच्या स्वाभीमानाची सुरक्षा करण्यासाठी आमचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही शेतकऱ्याच्या मुलाशी ल्गन करण्याऱ्या युवतील दोन लाख रुपये देणार, असे कुमारस्वामी यांनी सांगितले.

लवकरच जेडीएस उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध होणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जेडीएसमधील देवेगौडा परिवारातील अंतगर्त वाद संपणार आहे.माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा यांची सुन भवानी रेवन्ना देवेगौडा या हासन मतदार संघातून इच्छुक आहेत. भवानी रेवना या कुमार स्वामी यांच्या मोठ्या भावाची पत्नी आहे.

येत्या १० मे रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे. बहुचर्चित भाजपची पहिली यादी काल (मंगळवारी) रात्री जाहीर करण्यात आली.उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी दिल्लीमध्ये भाजपाची चार दिवसांपासून बैठक सुरू होती.

मंगळवारी रात्री केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रसाद यांनी ही यादी जाहीर केली आहे. यात भाजपने ५२ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ११ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे. ८ महिला उमेदवार आहेत. नऊ डाँक्टर, पाच वकील, दोन सनदी अधिकारी रिंगणात आहे.

गेल्या महिनाभरात भाजपमधून बंडखोरी करून 16 नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना बंडखोरी ग्रासत आहे.राज्यात सत्ताविरोधी लाट असून, काँग्रेस सत्तेत येण्याचे संकेत मतदानपूर्व चाचणीत मिळाले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेसचे सरकार निश्चित आहे, असे समजणार्‍या अनेक दिग्गजांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र, अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने इच्छुक आता बंडखोरीची भाषा करू लागले आहेत.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT