Maharashtra Politics : 'मातोश्री' वर चाललयं काय ? ; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याची घरवापसी ?

NCP Leader Anand Paranjpe news update : राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता ठाकरे गटाच्या वाटेवर
 Uddhav Thackeray, Anand Paranjpe
Uddhav Thackeray, Anand ParanjpeSarkarnama

NCP Leader Anand Paranjpe news update : ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या विविध घटनांनी ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील घडामोडींवर सगळ्यांचे लक्ष आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक नेता ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक, शहाराध्यक्ष आनंद परांजपे यांनी काल (रविवारी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण झाले आहे.

 Uddhav Thackeray, Anand Paranjpe
Rajasthan Politics News : गेहलोत-पायलट संघर्ष पुन्हा पेटला ; आपल्याच सरकारविरोधात पायलटांनी ठोकला शड्डू

आनंद परांजपे यांनी काही महिन्यापूर्वी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी काल (रविवारी) 'मातोश्री'वर जाऊन ठाकरेंची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 Uddhav Thackeray, Anand Paranjpe
Chhatrapati Shivaji Statue News : धक्कादायक : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; नागरिक रस्त्यावर..

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर परांजपे हे घरवापसी करणार, अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परांजपे यांनी ठाकरेंची भेट घेतली असल्याचे बोलले जाते, पण ही सदिच्छा भेट होती, असे परांजपे यांनी स्पष्ट केलं आहे.

 Uddhav Thackeray, Anand Paranjpe
Sharad Pawar News : शरद पवारांनी विरोधकांच्या अजून एका मुद्दाची हवा काढली ; मोदींची डिग्री हा...

कल्याण लोकसभेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेची (शिंदे गट) जोरदार मोर्चबांधणी सुरु आहे. तर शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी ठाकरे गटाला तगडा उमेदवार पाहिजे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट होती का? असा प्रश्न विचारला जात आहे.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com