BJP, JDS, Congress
BJP, JDS, Congress Sarkarnama
देश

Karnataka Exit Poll 2023: कर्नाटकात 'जेडीएस' बिघडवणार काँग्रेसचा खेळ ?; चार 'एक्झिट पोल'चा त्रिशंकूचा अंदाज

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Election : कर्नाटक विधानसभेसाठी बुधवारी (ता. १०) मतदान झाले. या निवडणुकीसाठी सायंकारी पाच वाजेपर्यंत ६६ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, राज्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपने सर्व २२४ जागा लढविल्या. काँग्रेसने २२३ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तसेच यावेळी राज्यात एकहाती सत्ता स्थापनेचा दावाही केला आहे. जेडीएस पक्षाने २०९ जगांवर निवडणूक लढविली आहे. त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्याचे चित्र दिसून आले.

भाजप-काँग्रेस-जेडीएस (Karnataka Election) या पक्षांनी जोरदार प्रचार केला. राज्यात बुधवारी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. एक्झिट पोल सादर केलेल्या चार संस्थांनी कर्नाटकमध्ये काँग्रेस सर्वात मोठा ठरणार असल्याचे भाकित वर्तविल आहे. मात्र पक्षाला एकहाती सत्ता स्थापन करता येणार नाही. एक्झिट पोलमध्ये राज्यात त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एच.डी. देवेगौडा यांचा जेडीएस पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

काय सांगतात एक्झिट पोल

रिपब्लिक टीव्ही-पी मार्क्यू - कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा होऊ शकते. येथे भाजपला (BJP) ८५-१०० जागा मिळतील. काँग्रेसला ९४-१०८ जागा मिळतील. जेडीएसला २४-३२ जागा मिळू शकतात. इतरांना २-६ जागा मिळू शकतात.

टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्ट्रेट : भाजपला ८८-९८ जागा मिळू शकतात. काँग्रेसला (Congress) ९९-१०९ जागा मिळू शकतात. जेडीएसला २१-२६ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. इतरांना ०-४ जागा मिळू शकतात.

टाइम्स नाऊ : भाजपला ७८-९२ जागा मिळतील. काँग्रेसला १०६-१२० जागा मिळण्याची शक्यता आहे. जेडीएसला २०-२६ आणि इतरांना २-४ जागा मिळण्याची शक्यता आहे.

झी न्यूज मॅट्रिज एजन्सी : भाजप ७९-९४ जागा जिंकू शकतो. काँग्रेस १०३-११८ जागा जिंकण्याची शक्यता आहे. जेडीएसला (JDS) २५-३३ जागा मिळू शकतात. इतर पक्ष आणि अपक्ष २-५ जागा मिळतील.

सुवर्ण न्यूज-जन की बात : भाजपला ९४-११७ जागा मिळू शकतात. काँग्रेसला ९१-१०६ जागा मिळू शकतात. जेडीएसला १४-२४ जागा मिळतील. इतरांना ०-२ जागा मिळू शकतात.

न्यूज नेशन-सीजीएस : भाजप ११४ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवेल. काँग्रेसला ८६ आणि जेडीएसला २१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तीन जागा इतर पक्षांच्या किंवा अपक्षांच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे.

(Edited by Suni Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT