Karnataka Election : मतदानानंतर शिवकुमारांची मोठी घोषणा, "म्हणाले काहीही झाले तरी..."

Shivakumar Announcement : २०१८ मध्ये बंडखोरांमुळे काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळले
D. K. Shivakumara
D. K. ShivakumaraSarkarnama

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. १०) मतदान झाले. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. दरम्यान मतदान झाल्यानंतर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मोठी घोषणा केली. तसेच कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, कर्नाटक निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी लागणार आहे.

D. K. Shivakumara
Supreme Court Hearing: सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच फडणवीसांचं मोठं भाष्य; एकनाथ शिंदेंबाबत म्हणाले...

कनकापुरा मतदारसंघात मतदान केल्यानंतर शिवकुमार (D.K. Shivakumar) म्हणाले की, "निवडणुकीनंतर कुठल्याही प्रकारची युती होणार नाही. काँग्रेस पक्षाची जेडीएससोबत युतीची कसलीही शक्यता नाही. आम्ही स्वबळावर सरकार स्थापन करणार आहोत. दरम्यान, २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेस-जेडीएसने युती केली होती. त्यानंतर बंडखोर आमदार भाजपमध्ये गेल्याने आमचे सरकार पडले."

D. K. Shivakumara
Nana Patole : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात 16 आमदार बाद होणार ; नाना पटोलेंचा दावा

शिवकुमार हे आपल्या कनकपुरा या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढवत आहेत. कनकपुरातून ते सलग सात वेळा विजयी झाले आहेत. मतदान केल्यानंतर त्यांनी रिक्षा चालविली. त्यांचा ऑटो रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान, शिवकुमार यांनी राज्यातील महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आठवून मदतान करण्याचे आवाहन केले होते.

शिवकुमार म्हणाले की, "निवडणुकीचा मुद्दा महागाई, भ्रष्टाचार, सुशासन आणि विकासाचा आहे. मी सर्वांना आवाहन करतो की तुमचा गॅस सिलिंडर पाहून मतदान करा. मी माझ्या सर्व नेत्यांना सिलिंडरला हार घालण्याचा सल्ला दिला आहे."

D. K. Shivakumara
Supreme Court News : सत्तासंघर्षाच्या युक्तीवादादरम्यान सरन्यायाधीशांनी केलेल्या महत्त्वपूर्ण टिप्पणी; निकालावर परिणाम होणार?

कर्नाटकचे (Karnakata) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddharmaih) यांनी पक्षाला १३० ते १५० जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, २०१८ मध्ये जेडीएसला ३७, काँग्रेसला (Congress) ७८ आणि भाजपला १०४ जागा मिळाल्या होत्या. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने युती केली होती.

दरम्यान, मतदानापूर्वी काँग्रेसने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'कन्नडीगा! मतदानाला जाण्यापूर्वी हा विधी करायला विसरू नका. व्हिडिओ पाहा'. या व्हिडिओला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने भाषणाची क्लिप जोडली होती. त्यात पंतप्रधान मोदी 'मतदान करण्यापूर्वी गॅस सिलिंडरला प्रार्थना करा' असे म्हणत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com