Jharkhand News : कथित भूखंड घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी सुरू असून त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे झारखंडमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ईडीच्या टीमने सोरेन यांच्या दिल्लीतील घरी दोन दिवसांपूर्वी रेड टाकल्यानंतर अटकेच्या शक्यता अधिक वाढली. पण, त्याआधी सोरेन यांनीच अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. (CM Hemant Soren News)
ईडीच्या (ED) टीमने सोमवारी सोरेन यांच्या दिल्लीतील घरी रेड टाकली होती. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दोन लक्झरी कार आणि 36 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. तसेच काही कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. यावेळी सोरेन घरी उपस्थित नव्हते. या रेडनंतर मुख्यमंत्री जवळपास 30 तास कुणाच्याही संपर्कात नव्हते.
मंगळवारी दुपारी सोरेन रांचीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आमदारांच्या बैठका घेतल्या. अटक झाल्यास पुढील रणनीती या बैठकांमध्ये ठरल्याचे समजते. बुधवारी सोरेन यांची ईडीच्या टीमने पुन्हा चौकशी सुरू केली आहे. त्याआधीच सोरेन यांच्याकडून सोमवारी रेड टाकलेल्या टीममधील अधिकाऱ्यांवर रांची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अट्रॉसिटीची तक्रार
सोरेन यांनी बुधवारी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचर प्रतिबंध) कायदा म्हणजे अट्रॉसिटी कायद्यांतर्गत ईडी अधिकाऱ्यांची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ईडीने केलेली कारवाई त्रास देण्यासाठी होती. तसेच आपल व आपल्या समाजाची प्रतिमा मलिन करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी तक्रारीत केला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांचीचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक चंदन कुमार सिन्हा यांनीही याला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचे अर्ज आमच्याकडे आला होता. त्यानुसार ईडीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.