Jharkhand News : मुख्यमंत्रिपदावरून जावा-जावांमध्ये भांडण; सोरेन कुटुंबात फूट?

CM Hemant Soren : मुख्यंमत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता...
Hemant Soren, Kalpana Soren, Sita Soren, Basant Soren
Hemant Soren, Kalpana Soren, Sita Soren, Basant SorenSarkarnama
Published on
Updated on

ED Raid : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कथित भूखंड घोटाळ्यात अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांना अटक झाल्यास मुख्यमंत्री कोण असेल, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. या मुद्यावरून सोरेन कुटुंबातच फूट पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना यांना मुख्यमंत्री करण्यास घरातूनच विरोध सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे दिवंगत बंधू दुर्गा सोरेन यांच्या आमदारपत्नीनेही मुख्यमंत्रिपदासाठी दावा केला आहे. (Jharkhand News)

हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या चौकशीसाठी ईडीचे पथक त्यांच्या रांचीतील घरी दाखल झाले आहे. मागील दोन दिवसांत घडलेल्या घडामोडींमुळे सोरेन यांना ईडीकडून अटक केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीचे सोरेन यांच्या दिल्लीतील घरावर ईडीने (ED) छापा टाकून दोन लक्झरी कार व ३६ लाखांची रोकड जप्त केली आहे.

Hemant Soren, Kalpana Soren, Sita Soren, Basant Soren
Budget Session 2024 : राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रत्येक वाक्यावर वाजली बाकं; मोदीही थकले नाहीत…

कोऱ्या कागदावर आमदारांच्या सह्या

ईडीच्या छाप्यानंतर सोरेन जवळपास ३० तास कुठेच दिसले नाहीत. त्यानंतर ते अचानक रांचीत दाखल झाले. झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांची बैठकही घेतली. या बैठकीत त्यांनी दोन कोऱ्या कागदांवर उपस्थित आमदारांच्या सह्या घेतल्याचे समजते. यामध्ये अटक झाल्यास मुख्यमंत्री म्हणून कल्पना यांच्या नावाला संमती आणि ज्येष्ठ नेते चम्पई सोरेन यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व देण्याबाबतची आमदारांची संमती घेण्यात आल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठकीला आमदारांची दांडी

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीला सर्व आमदार उपस्थित नव्हते. सात आमदारांनी बैठकीला दांडी मारल्याचे समजते. त्यामुळे पक्षात दोन गट पडल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यंमत्र्यांचे बंधू बसंत सोरेन व दिवंगत बंधू दुर्गा सोरेन यांच्या पत्नी सीता सोरेन हे दोघेही बैठकीला हजर नव्हते. कल्पना सोरेन यांच्या नावाला त्यांचा विरोध असल्याचे वृत्त आहे.

सोरेन कुटुंबात फूट

बसंत सोरेन व सीता सोरेन दोघेही आमदार आहेत. त्यांनी कल्पना सोरेन यांच्या नावाला विरोध केला आहे. मुख्यमंत्रिपदावर आपला दावा असल्याचे सीता सोरेन यांनी म्हटले आहे. पक्षातील 18 आमदारांचाही या दोघांना पाठिंबा असल्याचे समजते. बसंत सोरेन आमदार असून पक्षाच्या युथ विंगचे राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. पक्षाचे संस्थापक व त्यांचे वडील शिबू सोरेन यांनीही बसंत यांच्या दाव्याला समर्थन दिल्याची चर्चा आहे.

आता माघार नाही

प्रत्येकवेळी मीच का माघार घ्यायची. हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री केल्यानंतर आपण गप्प बसलो. पण आता नाही. कल्पना सोरेन या पदासाठी पात्र नसल्याचे सीता सोरेन यांनी म्हटले आहे. त्यामुळे सोरेन कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

R...

Hemant Soren, Kalpana Soren, Sita Soren, Basant Soren
Hindu Temples : मंदिरं पिकनिक स्पॉट नाहीत...! फक्त हिंदूंनाच प्रवेशाचे फलक लावण्याचे कोर्टाचे आदेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com