Kalpana Soren Sarkarnama
देश

Kalpana Soren News : माजी मुख्यमंत्री तुरुंगात अन् पत्नी निवडणुकीच्या रिंगणात; पहिल्याच भाषणात रडू कोसळलं

Hemant Soren News : कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. सध्या ते तुरुंगात आहेत. काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली.

Rajanand More

Jharkhand News : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन (Kalpana Soren News) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण त्याला घरातूनच विरोध झाल्याने झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन यांना ही खुर्ची मिळाली. त्यामुळे आता कल्पना सोरेन राजकारणात येणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. त्यावर आज पडदा पडला आहे. 

कल्पना सोरेन या गांडेय विधानसभा मतदारसंघातून निवडणूक (Assembly Election) लढणार असल्याचे पक्षाच्या खासदार महुआ माझी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे हेमंत सोरेन तुरुंगात असताना आता कल्पना सोरेन यांची ‘पॉलिटिकल एंट्री’ चर्चेत आली आहे. आता त्याच पक्षाची जबाबदारी हाती घेऊन राज्यात सक्रीय होतील, अशी चर्चा आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाचा (JMM) स्थापना दिवस काल साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कल्पना सोरेन यांची पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी त्यांना रडू कोसळलं. त्या म्हणाल्या होत्या की, तीन मार्चला माझा वाढदिवस होता. हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना जेलमध्ये जाऊन भेटले. त्यांनी हिम्मत दिली आणि त्यांचा आवाज बनून लोकांमध्ये जाण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर मी आता राजकीय जीवनाची सुरूवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सासरे शिबू सोरेन (Shibu Soren) यांची तब्बेत खूप नाजूक आहे. सासूची प्रकृतीही ठीक नसल्याचे सांगताना कल्पना सोरेन भावूक झाल्या. या दोघांचा आशिर्वाद घेऊन मी तुमच्यामध्ये आले आहे. आता आदिवासी, गरीब आणि अल्पसंख्यांकाचा आवाज बनू, असे म्हणत त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना साद घातली आणि सक्रीय राजकारणात पाऊल ठेवले.

दरम्यान, गांडेय विधानसभा मतदारसंघातील आमदाराने डिसेंबर महिन्यातच राजीनामा दिला आहे. त्याचवेळी या मतदारसंघातून कल्पना सोरेन निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा होती. पण त्यावेळी राजकीय परिस्थितीमुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. आता मात्र पती तुरूंगात गेल्यानंतर कल्पना यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश करत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT