Hemant Soren, Champai Soren Sarkarnama
देश

Champai Soren : टायगर को चूहा बना दिया! चंपई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचा नवा डाव

Jharkhand Mukti Morcha Nishikant Dubey Babulal Marandi BJP Hemant Soren : चंपई सोरेन यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने हेमंत सोरेन यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rajanand More

Ranchi : झारखंडमधील राजकीय वातावरण तापलं असून भाजपने मावळते मुख्यमंत्री व झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपई सोरेन यांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोरेन यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मागील आठवड्यात ते कथित भूखंड घोटाळाप्रकरणी जामीनावर जेलमधून बाहेर आले आहेत. तेव्हापासूनच चंपई सोरेन यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, पक्षाच्या बैठकीत चंपई सोरेन यांना रडवण्यात आल्याचा दावा भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी केला आहे. एक्सवर पोस्ट करत दुबे यांनी म्हटले आहे की, झारखंडमधील आंदोलनकारी नेता चंपई सोरेन यांना काल आमदारांच्या बैठकीत रडवण्यात आले. झारखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू नेत्यासोबत वाद झाला? हीच झारखंडची संस्कृती आहे का?

एवढ्यावरच न थांबता दुबे यांनी आदिवासींच्या सन्मानासाठी बाबुलाल मरांडी मैदानात असेही म्हटले आहे. मरांडी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. यातून दुबे यांनी चंपई यांना भाजपमध्ये येण्याचे थेट निमंत्रण दिल्याची चर्चा रंगली आहे.

बाबुलाल मरांडी यांनीही नाव न घेता हेमंत सोरेन यांच्यावर टीका केली आहे. जेएमएमने कोल्हानच्या वाघाला उंदीर बनवले आहे. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा जनतेच्या समोर आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही जेएमएम आणि काँग्रेसवर टीका केली आहे. झारखंडमधील जनतेने ज्येष्ठ आदिवासी नेत्याला पदावरून हटवल्याबद्ल त्याचा निषेध करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT