Hemant Soren Sarkarnama
देश

Hemant Soren : चौथ्यांदा शपथ घेत हेमंत सोरेन यांनी रचला इतिहास; पहिल्याच निवडणुकीत झाला होता पराभव

Jharkhand CM India Alliance Jharkhand Mukti Morcha : झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची चौथ्यांदा शपथ घेणारे हेमंत सोरेन हे पहिलेच नेते ठरले आहेत. विशेष म्हणजे एकाच वर्षात त्यांनी दोनदा शपथ घेतली आहे.

Rajanand More

CM Oath Ceremony : झारखडंमध्ये गुरूवारी इतिहास घडला. हेमंत सोरेन यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची चौथ्यांदा शपथ घेत हा इतिहास घडवला आहे. सलग दोनदा आणि एकूण चारवेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे ते पहिले नेते ठरले आहेत. पहिल्याच निवडणुकीत पराभूत झालेल्या सोरेन यांनी 2009 नंतर कधीच हार मानली नाही.

विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांच्या आघाडीने मोठे यश मिळवले. राज्यात पहिल्यांदाच एखादा पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत आला आहे. आज सोरेन यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, अशी चर्चा होती. पण केवळ सोरेन यांनीच शपथ घेतली.

शपथविधीसाठी इंडिया आघाडीतील बहुतेक सर्वच पक्षांतील बड्या नेत्यांची उपस्थिती होती. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह अनेक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती.

सोरेन यांचा राजकीय प्रवास

2005 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सोरेन यांनी 2009 च्या निवडणुकीत दुमका मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्याआधी काही महिने ते राज्यसभेवर निवडून गेले होते. पण विधानसभेसाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. पहिल्याच विजयानंतर काही महिन्यांतच ते राज्याचे उपमुख्यमंत्री बनले.

हेमंत सोरेन यांनी 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचा कार्यका 23 डिसेंबर 2014 पर्यंत होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत सत्ता काबीज केली. पण 2019 मध्ये पुन्हा एकदा आघाडीने सत्ता मिळवल्यानंतर सोरेन यांनी दुसऱ्यांदा सीएम पदाची शपथ घेतली.

लोकसभा निवडणुकीआधी कथित भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीने त्यांनी अटक केली. पण त्याआधी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चंपई सोरेन मुख्यमंत्री बनले होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काही दिवसांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने पुन्हा सत्ता काबीज केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT