Mamata Banerjee : मी मोदी सरकारसोबत उभी! अधिवेशन सुरू असतानाच ममतांची हमी

Modi Government Bangladesh Violence against Hindu : बांग्लादेशातील हिंदूवर होत असल्या हल्ल्यांबाबत सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
Mamata Banerjee, PM Narendra Modi
Mamata Banerjee, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Kolkata : बांग्लादेशमध्ये अजूनही हिंदुंवरील अत्याचार थांबलेले नाहीत. हिंदूंना संघटित करणाऱ्या चिन्मय प्रभू यांना नुकतीच अटकही करण्यात आली आहे. त्याविरोधात पश्चिम बंगालसह देशात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही यावरून मोठं विधान केले आहे.

ममतादीदींनी गुरूवारी विधानसभेत बोलताना बांग्लादेशातील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावर आपण केंद्र सरकारसोबत असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, जेव्हा दुसऱ्या देशातील भारतीयांचा मुद्दा येतो, तेव्हा आम्ही केंद्र सरकारसोबत उभे राहतो. हे आमच्या पक्षाचे धोरण आहे. कोणत्याही धर्मातील लोकांवर अत्याचार होत असेल तर आम्ही त्याचाही निषेध करतो.

Mamata Banerjee, PM Narendra Modi
Priyanka Gandhi : केरळची पारंपरिक कसावू साडी अन् हातात संविधान..! प्रियांका गांधींची लोकसभेतील पहिली 'एन्ट्री' चर्चेत

बांग्लादेशात कोणत्याही धर्माच्या लोकांवर अत्याचार होत असेल तर आम्ही त्याचे अजिबात समर्थन करणार नाही, असेही ममता म्हणाल्या. बांग्लादेशातील हिंदू नेते चिन्मय प्रभू यांना अटक केल्याच्या घटनेवर बोलताना ममतादीदी म्हणाल्या, मी राज्यातील इस्कॉन प्रमुखांशी बोलले आहे. हा दुसऱ्या देशातील मुद्दा असल्याने केंद्र सरकारने यावर योग्य कार्यवाही करायला हवी. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी प्रभू यांच्या अटकेची निंदा केली होती. ‘बांग्लादेशमध्ये होत असलेल्या घटना दुर्दैवी आहेत. केंद्र सरकारने निर्णायक कार्यवाही करायला हवी, हे बॅनर्जी यांनी म्हटले होते. तर भाजपचे खासदार गिरीराज सिंह यांनी बांग्लादेशमधील घटनांमध्ये संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

Mamata Banerjee, PM Narendra Modi
Ravindra Chavan Oath Ceremony: रविंद्र चव्हाण यांनी खासदारकीची शपथ घेताच गदारोळ; काय घडलं लोकसभेत?

इस्कॉनवर बंदी?

चिन्मय प्रभू यांनी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. बांग्लादेशातील कोर्टाने त्यांना जामीन नाकारला आहे. ते बांग्लादेशातील इस्कॉनचे सदस्य असून इस्कॉनवर बंदीची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. अशी बंदी घालण्यास कोर्टाने नकार दिला आहे. इस्कॉनच्या मंदिरांवर हल्ले झाले असून भारताने त्यावर जाहीर नाराजीही व्यक्त केली आहे. तसेच प्रभू यांच्या अटकेवरही बांग्लादेशातील उच्चायुक्तांकडे चिंता व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com