Angomcha Bimol Akoijam Sarkarnama
देश

Congress MP case : दहा विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, प्राध्यापक असलेल्या काँग्रेस खासदाराची हकालपट्टी

Angomcha Bimol Akoijam, JNU professor dismissed, JNU sexual harassment case, Congress MP Manipur : विद्यापीठातील १० विद्यार्थिनींनी डॉ. अकोइजम यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. काही महिन्यांपूर्वी ही माहिती समोर आली होती.

Rajanand More

Sexual harassment case : नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठात प्राध्यापक असलेले काँग्रेसचे खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अकोइजम यांच्यावर किमान दहा विद्यार्थ्यांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. विद्यापीठाच्या चौकशी समितीच्या अहवालानंतर अकोइजम यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

खासदार अकोइजम हे विद्यापीठातील समाज व्यवस्था अभ्यास केंद्रात प्राध्यापक होते. त्यांना विद्यापीठाने सेवेतून बडतर्फ केले आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी गुरुवारी याबाबतचा आदेश काढला आहे.

अकोइजम यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी अंतर्गत समितीकडून करण्यात आली. चौकशीअंती त्यांच्यावर कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली होती. त्याआधारे बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

विद्यापीठातील १० विद्यार्थिनींनी डॉ. अकोइजम यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. काही महिन्यांपूर्वी ही माहिती समोर आली होती. याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्या होत्या. अकोइजम यांनी निवासस्थानी बोलवून आक्षेपार्ह पध्दतीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विभागातील विद्यार्थ्यांनी केला आहे.

एवढेच नाही तर वर्गामध्येही अकोइजम यांच्याकडून विद्यार्थ्यांबाबत अश्लील टिप्पणी आणि गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर काही वरिष्ठ विद्यार्थीही अकोइजम यांच्याविरोधात पुढे आले होते.

दरम्यान, अकोइजम हे काँग्रेसचे मणिपूरमधील विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आता विद्यापीठानेही त्यांची बडतर्फी केल्याने या मुद्द्यावर राजकारण तापण्याची शक्यता आहे. अकोइजम यांनी आपल्यावरील सर्व आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT