Bypoll Results 2026 : लोकसभा अन् विधानसभेच्या प्रतिष्ठेच्या लढतींमध्ये विरोधकांना जोरदार झटका; भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने

BJP ahead, Nandigram Rejinagar bypoll result, Nagaon Lok Sabha bypoll, Congress : नंदीग्राममध्ये भाजपच्या उमेदवार हसीराणी रथ यांनी तिसऱ्या फेरीपर्यंतच २७ हजारांहून अधिक मताधिक्य मिळविले आहे.
BJP Congress
BJP CongressSarkarnama
Published on: 
Updated on: 

West Bengal by-election Result : देशातील एक लोकसभा आणि विधानसभेच्या पाच जागांवरील पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीच्या काही फेऱ्यांचे कल हाती आले आहे. प्रतिष्ठेच्या लढतींमध्ये विरोधकांना जोरदार झटका बसला आहे. तर भाजपने मुसंडी मारत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच देशात बरीच चर्चा झाली होती. तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण या दोन्ही मतदारसंघात भाजपने सुरूवातीलाच मोठी आघाडी घेत विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे.

नंदीग्राममध्ये भाजपच्या उमेदवार हसीराणी रथ यांनी तिसऱ्या फेरीपर्यंतच २७ हजारांहून अधिक मताधिक्य मिळविले आहे. तर ऐन निवडणुकीत अटक झाल्याने चर्चेत आलेले काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान ७ हजार ३७० मतांसह दुसऱ्या स्थानी आहेत. या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्याने ममतांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. तर बंडखोर आमदारांचा गट असलेल्या डेमोक्रेटिक तृणमूलचा उमेदवार थेट पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे.

BJP Congress
संसदेत एकही दिवस न जाताच खासदारकीचा राजीनामा, आता 'या' महिला नेत्याची भाजपला भुरळ

रेजीनगर हा मतदारसंघ भाजप आपल्या नावावर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहि्या दोन फेऱ्यांमध्येच भाजपचे उमेदवार शंकरव सरकार १६ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. आम जनता उन्नयन पक्षाचा उमेदवार दुसऱ्या तर काँग्रेसचा उमेदवार १२९१ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला जोरदार झटका बसला असून त्यांचा उमेदवार तिसऱ्या तर डेमोक्रेटिकचा उेमदवार सहाव्या क्रमांकावर आहे.

BJP Congress
former BJP MP quits : भाजपला जोरदार झटका; ज्या मातब्बर नेत्यासाठी मनेका गांधींचा मतदारसंघ बदलला, त्यांचीच पक्षाला सोडचिठ्ठी

लोकसभा पोटनिवडणुकीतही आघाडी

भाजपने लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही मोठी आघाडी घेतली आहे. आसाममधील नागांव मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार देवाशिष शर्मा यांनी ८० हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या उमेदवार शिवमोनी बोरा या दीड लाखांहून अधिक मतांनी पिछाडीवर असून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर ऑल इंडिया यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे मोहम्मद बद्रुद्दीन अजमल हे १ लाखांहून अधिक मतांसह दुसऱ्यास्थानी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com