JNU Election 
देश

JNU Election 2025: जेएनयूत डाव्यांचा ABVPला धोबीपछाड! विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकल्या

JNU Election 2025: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात JNUच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.

Amit Ujagare

JNU Election 2025: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात JNUच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये डाव्यांनी अभाविपला धोबीपछाड दिली अन् सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. अभाविपला यामध्ये एकही जागा जिंकता आली नाही. यामध्ये आदिती मिश्रा हिची अध्यपदी निवड झाली. तर के. गोपिका उपाध्यक्ष, सुनील यादव महासचिव आणि दानिश अली सहसचिव म्हणून निवडून आले.

४ नोव्हेंबर रोजी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेची निवडणूक पार पडली होती. याचा निकाल आज ६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये सेंट्रल पॅनेलमधील सर्वच्या सर्व चार जागांवर (अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी आणि जॉईंट सेक्रेटरी) यांवर डाव्या संघाच्या उमेदवारांचा विजय झाला. यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात ABVPचा यामध्ये सुफडा साफ झाला. गेल्या वर्षी एक जागा अभाविपला मिळाली होती. पण यावेळी केवळ जॉईंट सेक्रेटरीची जागाच अशी होती ज्यावर 'काँटे की टक्कर' सारखी स्थिती होती. या जागेवर डाव्यांचा विद्यार्थी उमेदवार सुनील यादव याचा केवळ काही मतांच्या फरकानं विजय झाला.

विद्यार्थी संघटनेच्या या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं होतं. यावर्षीची मतदानाची टक्केवारी ही गेल्यावर्षी पेक्षा थोडी कमी राहिली. यावर्षी ६७ टक्के मतदान झालं, तर २०२४ मध्ये ७० टक्के मतदान झालं होतं. तर २०२३-२४ मध्ये मतदानाचं हे प्रमाणं ७३ टक्के इतकं होतं. गेल्या दशकातील ही सर्वाधिक मतांची टक्केवारी होती. यावर्षी एकूण ९०४३ विद्यार्थी चार प्रमुख केंद्रीय पदांना मतदानासाठी तसंच विविध कॉलेजमधील ४२ जागांसाठी मतदानासाठी पात्र होते. यंदाचं जेएनयू विद्यार्थी संघटनेची निवडणुकीचा सामना डावी आघाडी आणि अभाविप यांच्यामध्ये होता. डाव्या आघाडीत AISA, SFI आणि DSF या प्रमुख पक्षांची युती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT