Bihar Election 2025: भाजप नेत्यांचा कारनामा! सहा महिन्यांपूर्वी केलं दिल्ली विधानसभेला मतदान, आता बिहारमध्येही...

Bihar Election 2025: बिहार विधानसभेसाठी आज पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. राज्यात एकूण 64.66 टक्के मतदान पार पडलं आहे. भाजपनं बिहारसाठी यंदा चांगलाच जोर लावला आहे.
Bihar Election 2025
Bihar Election 2025
Published on
Updated on

Bihar Election 2025: बिहार विधानसभेसाठी आज पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. राज्यात एकूण 64.66 टक्के मतदान पार पडलं आहे. भाजपनं बिहारसाठी यंदा चांगलाच जोर लावला आहे. त्यातच या निवडणुकीतील काही खळबळजनक प्रकार सध्या समोर आले आहेत. भाजपच्या नेत्यांनी आणि खासदारांनी सहा महिन्यांपूर्वी दिल्ली विधानसभेला आणि आता बिहार विधानसभेला मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे. यांपैकी भाजपच्या खासदारानं तर आपण दोन्ही ठिकाणी मतदान केल्याचं स्वतःच मान्यही केलं आहे.

Bihar Election 2025
Kerala SIR: केरळमध्ये SIR सुरु! फॉर्म वाटपासाठी गेलेल्या BLOच्या अंगावर सोडला कुत्रा; नागरिकांमध्ये इतका राग का?

मतदार क्रमांक १

संतोष ओझा नावाचा भाजपचा एक कार्यकर्ता आहे. या व्यक्तीनं ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदान केलं. मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावलेला फोटो त्यानं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना त्यानं लिहिलं की, "माझं मत पूर्वांचलच्या सन्मानासाठी आहे. माझं मत हे विकसित दिल्लीसाठी आहे" त्यानंतर आज ६ नोव्हेंबर २०२५ रोजी याच संतोष ओझा यांनी बिहारमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत मतदान केलं. यासाठी त्यांनी मतदान केल्याचा पुरावा म्हणून मतदान केंद्रावरुन बोटावर शाई लावल्याचा फोटो शेअर केला. तसंच याला कॅप्शन देताना म्हटलं की, "समृद्ध बक्सर, सशक्त बिहार. विकसित भारतासोबत संकल्पासह 'आनंदमय मतदान'"

Bihar Election 2025
BJP Vs Shivsena Politics: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत भाजपने बाह्या सरसावल्या, मात्र एकनाथ शिंदे यांचा शिलेदार त्यांची डाळ शिजू देईल का?

मतदार क्रमांक २

तर दुसरीकडं भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक प्रा. राकेश कुमार सिन्हा यांनी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी द्वारका विधानसभा मतदारसंघातून मतदान केलं होतं. त्यानंतर याच प्राध्यापकांनी आज ६ नोव्हेंबर २०२५ रोजी आपल्या मूळ गावी मनसेरपूरमध्ये (बेगुसराय) मतदान केलं. या दोन्ही मतदानांनंतर त्यांनी बोटाला शाई लावल्याचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.

Bihar Election 2025
Nagpur BJP : CM फडणवीसांनी विश्वासू नेत्याकडे दिली 'नागपूरची' जबाबदारी : लोकसभेला हिरमोड झालेला नेताही सोबतीला!

दरम्यान, प्रा. राकेश कुमार सिन्हा यांनी आपण दोन्ही ठिकाणी मतदान केलं असल्याचं मान्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, २८ एप्रिल २०२५ रोजी मी दिल्लीतील मतदान यादीतून नाव काढून बिहारमधील गावी नोंदवलं. पण त्यांनी ४ सप्टेंबर २०२५ रोजी दिल्ली विद्यापीठाच्या अध्यापक संघाच्या निवडणुकीत स्वतःचा प्रचार करत होते. इथल्या एका कॉलेजमध्ये ते शिकवतात. यांचा हा गोलमाल आपच्या सौरभ भारद्वाज यांनी उघड केलं आहे. त्यावर सिन्हा यांनी त्यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल करुन खटला भरण्याचा इशारा दिला आहे.

Bihar Election 2025
Election update : निवडणूक आयोगाला आश्चर्याचा धक्का; बिहारमध्ये मतदान सुरू असतानाच आयुक्तांना थेट दक्षिण आफ्रिकेतून फोन

निवडणूक आयोगाचा नियम काय?

ही वरील दोन्ही उदाहरणं पाहिल्यानंतर एकाच व्यक्तीला अशा प्रकारे दोन वेगळ्या ठिकाणी मतदान करता येतं का? यासंदर्भात निवडणूक आयोगाचा नियम काय सांगतो? याची माहिती घेतली असता, निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार, अर्थात रिप्रेझेंटेटिव्ह अॅक्ट १९५०च्या कलम १९ (ब) नुसार, जर एखादी व्यक्ती एका ठिकाणी नोकरनिमित्त राहत असेल तर त्या व्यक्तीला नोकरीच्या ठिकाणीच मतदान करता येतं, आपल्या मूळ गावी मतदान करता येत नाही.

तसंच याच कायद्यान्वये कलम १७ आणि १८ नुसार एका व्यक्तीला दोन ठिकाणी मतदार म्हणून नाव नोंदणी करता येत नाही. त्यामुळं भाजप नेते संतोष ओझा आणि प्रा. राकेश कुमार सिन्हा यांनी याच दोन्ही नियमांचं उल्लंघन केल्याचं त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर शेअर केलेल्या मतदानाच्या फोटोंवरुन सिद्ध होतं असल्यानं मतचोरी बरोबरच हा आणखी एक वेगळाच घोटाळा असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com