Prashant Kishore
Prashant Kishore sarkarnama
देश

काँग्रेससोबत काम न करण्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले कारण..

सरकारनामा ब्युरो

पाटणा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) हे सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. त्यांनी काँग्रेसबाबत (Congress) मोठ विधान केल असून प्रशांत किशोर यांनी काँग्रेसबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Prashant Kishore On Congress news)

प्रशांत किशोर हे सध्या बिहार (Bihar) दौऱ्यावर आहेत. बिहारचा दौरा केल्यानंतर प्रशांत किशोर 2 ऑक्टोबरपासून चंपारण येथून पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. प्रशांत किशोर वैशालीच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर बिहारला पोहोचले आहेत.

प्रशांत किशोर जनसुराज्य यात्रेची सुरुवात करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय रघुवंश प्रसाद सिंह यांच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी रघुवंश प्रसाद यांना आदरांजली अर्पण केली. प्रशांत किशोर यांनी स्थानिकांशी संवाद देखील साधला.

प्रशांत किशोर यांनी विविध पक्षांसोबत केलेल्या कामाची माहिती त्यांनी उपस्थितांना सांगितली. यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, "या दहा वर्षांत त्यांनी वेगवेगळ्या पक्षांसोबत अकरा निवडणुका लढवल्या. ज्यामध्ये त्याने सर्व काही जिंकले. पण 2017 मध्ये त्यांनी यूपी (UP Election)निवडणुकीत काँग्रेससोबत काम केले. ज्यामध्ये त्यांना फक्त पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता त्यांनी काँग्रेससोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे,"

"काँग्रेसची सध्याची मांडणी अशी आहे की, ती केवळ स्वत:लाच गमावणार नाही, तर आपल्यालाही बुडवेल. ते म्हणाले की, 2011-21 या काळात गेल्या अकरा वर्षांत अकरा निवडणुकांशी त्यांचा संबंध होता. यादरम्यान ते फक्त एकच निवडणूक हरले, तीही यूपीमध्ये काँग्रेससोबत, त्यामुळे आता त्यांनी ठरवलं आहे की भविष्यात काँग्रेससोबत काम करणार नाही. कारण काँग्रेस माझा ट्रॅक रेकॉर्ड खराब करेल," असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

"प्रशांत किशोर यांनी काँग्रेस स्वत: सुधारणार नाही आणि आपल्याला बुडवेल, असं म्हटलं. काँग्रेसबद्दल माझ्या मनात आदर आहे मात्र त्यांची सध्याची स्थिती सर्वांना माहिती आहे. २०११ पासून २०२१ मध्ये मी ११ निवडणुकांसबधी काम केली. त्यापैकी एका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, असं प्रशांत किशोर म्हणाले.

"उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत व्हावं लागलं होतं. तेव्हापासून त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. या लोकांनी माझं रेकॉर्ड देखील खराब केलं, असं प्रशांत किशोर म्हणाले. मात्र, पराभवातून खूप शिकता आलं," असे प्रशांत किशोर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT