कोलकत्ता : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक के. के. (कृष्णकुमार कुन्नथ) (Krishnakumar Kunnath) यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के. केंच्या निधनाबाबत टि्वट करीत शोक व्यक्त केला आहे.
केके यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे. न्यू मार्केट पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे. त्यांच्या मृत्यूचं गुढ वाढलं आहे. (Singer KK Passes Away)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, केके (वय ५३) यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा आहेत. केके यांचा मृत्यू शारिरीक आजाराने झाला की अन्य कारणाने झाला याचा तपास पोलीस करत आहेत. (KK Death News updates)
केके यांच्या मृत्यूप्रकरणी आयोजक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे.आज त्यांचे कुटुंबीय कोलकत्ता येथे येत आहेत. शवविच्छेदनानंतर केकेंच्या मृत्यूचे कारण समजू शकेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केके (Singer KK) यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखमा झाल्या होत्या. कोलकातामधील एसएसकेएम रुग्णालयात ऑटोप्सी करण्यात येणार आहे. यानंतर हॉटेल स्टाफ आणि कार्यक्रम व्यवस्थापनाचीही चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
के.के. यांचे मंगळवारी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले. कोलकत्तामध्ये आपल्या शोनंतर परतत असताना ग्रँड हॉटेल येथे केके हृदयविकाराच्या धक्क्याने कोसळले. त्यानंतर त्यांना तत्काळ CMRI (कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. केके यांनी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.