CJP spokesperson Saurabh Das, JP Nadda Sarkarnama
देश

CJP on JP Nadda : "धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावाच लागेल; जेपी नड्डांना लाज वाटली पाहिजे...", CJP प्रवक्ता पहिल्यांदाच थेट मोदींच्या मंत्र्याला भिडला

Saurabh Das on NEET Protest : केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी बुधवारी (22 जुलै) पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यार्थी आंदोलनाचे राजकारण करू नये, असं म्हटलं. त्यांच्या याच वक्तव्यावर कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पहिल्यांदाच सरकारच्या मंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

Jagdish Patil

NEET Protest : केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी बुधवारी (22 जुलै) पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यार्थी आंदोलनाचे राजकारण करू नये, असं म्हटलं. तर या आंदोलनाचा काँग्रेस राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तसंच नीटच्या मुद्द्यावर संसदेत सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही तयार असल्याचंही ते म्हणाले. तर जे.पी. नड्डा यांच्या याच वक्तव्यावर कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पहिल्यांदाच सरकारच्या मंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

"आंदोलनाचे राजकारण करू नये असं म्हणणाऱ्या जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे. लोक 30 दिवसांहून अधिक काळ इथे बसलेत. विद्यार्थ्यांची डोकी फोडली. आम्ही नाही तर तेच राजकारण करत आहेत", अशा संतप्त शब्दात दास यांनी जेपी नड्डा यांच्यावर निशाणा साधला.

माध्यमांशी बोलताना सौरव दास म्हणाले, "जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे. लोक इथे 30 दिवसांहून अधिक काळ बसलेत. विद्यार्थ्यांची डोकी फोडली. आम्ही नाही तर तेच राजकारण करतायत, उलट आम्ही तर म्हणतो की त्यांनी राजकारण करावं, राजकारणात आपण लोकांसाठी काम करतो, लोकांचं म्हणणं ऐकतो. पण मला कळत नाही, या सरकारच्या मनात नेमकं काय सुरू आहे.

लाखो लोक इथे जमलेत. सरकारच्या विरोधात देशभरात प्रचंड निराशा आहे. त्याचे पडसाद छोट्या छोट्या गावांमध्ये पाहायला मिळत आहेत. दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला, लोकांची डोकी फोडली त्याविरोधात लोकं आवाज उठवत आहेत", असं दास म्हणाले.

तर यावेळी दास यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला. ते नेहमी म्हणतात की चाणक्य नीती आहे, हीच का तुमची चाणक्य नीती? असे असेल तर तुम्ही दूर व्हा, खुर्ची सोडा. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. त्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही, मग ते कितीही दिवस सुरू राहू द्यात, असा इशारा सीजेपीने सरकारला दिला आहे.

दरम्यान, आपण सोनम वांगचुक यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी त्यांनी हे आंदोलन शांततापूर्णच राहिले पाहिजे असं सांगितलं. शिवाय हे आंदोलन योग्य रीतीने करण्याचे जाहीर आवाहनही वांगचुक केलं. या देशातील पूर्वीच्या आंदोलनांमध्ये सत्ताधारी पक्षाने पेरलेले समाजकंटक घुसखोरी करून आंदोलन भरकटवतात, आणि आंदोलन करणाऱ्यांनाच दोष दिला जातो, त्यामुळे असं काही होऊ नये यासाठी शांततेत आंदोलन करा, असंही वांगचुक यांनी आपणाला सांगितल्याचं दास म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT