Shrirampur Rape Case : बंदुकीचा धाक, धमक्या अन् 40 दिवस डांबून ठेवत अत्याचार; हिंदुत्ववादी नेत्यासह तिघांवर गुन्हा

Three booked after woman's complaint; police begin detailed investigation : श्रीरामपूरमध्ये 25 वर्षीय युवतीच्या फिर्यादीनंतर तिघांविरुद्ध बलात्कार, बेकायदेशीर कैद, धमकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू.
Shrirampur Rape Case
Shrirampur Rape CaseSarkarnama
Published on
Updated on

Shrirampur Crime : कोपरगाव येथील 25 वर्षीय युवतीच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध बलात्कार, बेकायदेशीर कैद, धमकी आणि इतर संबंधित कलमांखाली गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत श्रीरामपूर शहरात ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला असून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता श्रीरामपूर (Shrirampur) येथे तिच्या आजीकडे आली असताना तिची ओळख बाबू साळवे याच्याशी झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत तिला सुमारे 40 दिवस एका खोलीत डांबून ठेवत वेळोवेळी लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

तसेच, सागर बेग आणि सोनू बेग यांनी बंदुकीचा धाक (Crime) दाखवत पीडितेला धमक्या दिल्या. तिच्या मुलाला मारून टाकण्याची किंवा गायब करण्याची भीती दाखवत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

Shrirampur Rape Case
Sonu Beg POCSO Case : श्रीरामपूरमधील गुन्हेगारीचा काळा चेहरा! कुख्यात सोनू बेगला पोक्सो गुन्ह्यात अटक, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, पीडिता गर्भवती

बुधवारी सकाळी पीडितेने शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक पडताळणीनंतर घटनास्थळ श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने प्रकरण तेथे वर्ग करण्यात आले. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला.

Shrirampur Rape Case
Child Marriage POCSO Case : बालविवाहानंतर छळ; पतीसह 13 जणांवर POCSO अन् बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एक आरोपी सोनू बेग हा अन्य एका गुन्ह्यात सध्या पोलिस कोठडीत असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी पोक्सो आणि आर्म ॲक्टअंतर्गतही गुन्हे नोंद आहेत. बाबू साळवे याच्यावर खून, विनयभंग आणि आर्म ॲक्टसह विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. सागर बेग याच्याविरुद्धही यापूर्वी विविध स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या प्रकरणात नोंदविण्यात आलेले सर्व आरोप हे फिर्यादीतील असून त्यांचा तपास सुरू आहे. आरोपींची भूमिका, पुरावे आणि इतर बाबींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com