JP Nadda, Devendra Fadanvis  Sarkarnama
देश

Bjp News : नड्डांचा दौरा अचानक रद्द; फडणवीस गाठणार गोवा; मंत्रिमंडळ फेरबदल...

Sachin Waghmare

Panaji News : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा गोव्याचा दौरा अचानक रद्द झाल्याने त्यांच्या जागी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोव्याला जाणार आहेत. फडणवीस शनिवारी एक दिवसीय गोवा दौरा करणार आहेत. त्यांच्या हस्ते गोव्यातील भाजप मुख्यालयाची पायाभरणी करण्यात येणार असल्याची माहिती गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली.

जे. पी. नड्डा ( Jp Nadda) हे गोव्यात आल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, नड्डा हे येणार नसल्याने याबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. (Bjp News )

गोवा भाजपच्या वतीने फोंडा पणजी बायपास मार्गावर चिंबल येथे भाजप मुख्यालयाची उभारणी केली जात आहे. या मुख्यालयाची पायाभरणी शनिवारी भाजप केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते केली जाणार होती. दरम्यान, नड्डा यांना दिल्लीत महत्वाची बैठक असल्याने कार्यक्रमात बदल करण्यात आला. नड्डा यांच्या ऐवजी आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते भाजप मुख्यालयाची पायाभरणी केली जाणार आहे, अशी माहिती तानावडे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी फडणवीस शनिवारी गोव्यात येणार आहेत.

मंत्रिमंडळ फेरबदलांच्या चर्चांना तात्पुराता ब्रेक!

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा गोव्यात आल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत चर्चा होईल, अशी माहिती समोर आली होती. नड्डा मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्या चर्चा करणार होते. त्यानंतरच फेरबदलाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

दरम्यान, नड्डा यांच्या ऐवजी आता देवेंद्र फडणवीस गोव्यात येणार असल्याने आता फेरबदलांच्या चर्चांना तात्पुराता ब्रेक मिळाला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी फेरबदलाची आवश्यकता असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेस गोव्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह माजी खासदार नरेंद्र सावईकर, आमदार संकल्प आमोणकर, भाजप नेते दामू नाईक हे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT