Jayant Patil News : महायुतीत लवकरच मोठा धमाका होणार; जयंत पाटलांचे मोठे संकेत; म्हणाले, 'आणखी नेते...'

Political News : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जास्त आमदार कसे निवडून येतील याचा प्रयत्न आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापुरातील नेते समरजित घाटगे यांना उद्या भेटायला येणार होतो, पण त्याऐवजी शुक्रवारीच आलो. महाराष्ट्रातील आणखी नेते संपर्कात आले तर हळूहळू समोर येईल. आताच त्याबाबत बोलणे योग्य होणार नाही. के. पी. पाटील आणि माझी या आधी दोन-तीन वेळा भेट झाली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जास्त आमदार कसे निवडून येतील याचा प्रयत्न आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कोल्हापूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (Jayant Patil News)

महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना सत्ताधारी आपल्या बाजूने येण्यासाठी दबाव टाकतात. कर्जप्रकरणी असतील तर कारखानदारांची प्रकरणे थांबवली जातात. पक्षपातीपणा करत सरकार सध्या काम करत आहे. सरकारच्या पैशावर लाडकी बहीण योजना काढली, त्याचे इव्हेट केले जात आहेत पण राज्यात महिला आणि लहान मुली सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षित नसतील तर दुसरी कोणतेही मदत उपयोगाची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी इतर दोघांच्या तुलनेत बरीच मजल मारली आहे, त्यांनी दोघांनाही मागे टाकले आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा कब्जा घेतल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे कार्यकर्त्यांना हे कळले आहे, त्यामुळे परिस्थिती हळूहळू बदलत असल्याचे त्यांनी सांगितले

Jayant Patil
Shambhuraje Desai News: ठाण्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाईंना शोधा; मुरबाडमधील 'त्या' बॅनरची एकच चर्चा

महिलांच्या सुरक्षेकडे, अत्याचाराकडे दुर्लक्ष केले तर चालते अशा पद्धतीने पोलीस वागत आहेत. महाविकास आघाडीत तिन्ही पक्षात कम्युनिकेशन चांगले आहे. उलट पलीकडे ईडीच्या टांगत्या तलवार असल्याने दोघांनी मीठ्ठया मारल्या आहेत, असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil
Beed Assembly Election : बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या हायप्रोफाइल लढती ठरणार लक्षवेधी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com