Justin Trudeau News  Sarkarnama
देश

Justin Trudeau Resigned : कॅनडात राजकीय भूकंप! , जस्टिन ट्रूडोंनी पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा

Justin Trudeau Stepdown : अर्थमंत्र्यांनीही राजीनामा दिला; कॅनडात राजकीय अस्थिरता वाढण्याचे संकेत

Mayur Ratnaparkhe

Canada PM Justin Trudeau News : कॅनडात पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता त्यांच्या दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. ट्रूडो यांनी भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता राजीनाम्याची घोषणा केली. जस्टिन ट्रूडो यांच्या राजीनाम्याआधी एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारप्रती वाढत्या असंतोषाच्या कारणाने त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. ट्रूडो यांच्या शिवाय अर्थमंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॅनडात राजकीय अस्थिरता वाढण्याचे संकेत आहेत.

कॅनडातील सरकारमधील एका अधिकाऱ्याने म्हटले की, सत्ताधारी लिबरल पार्टीमध्ये पुढील नेत्याची निवड होईपर्यंत ट्रूडो कार्यवाहक पंतप्रधान राहतील. अधिकाऱ्यांनी गोपनियतेच्या अटीवर म्हटले की देशाच्या संसदेचे सत्र 27 जानेवारीपासून प्रस्तावित होते. मात्र आता राजीनाम्याच्या कारणाने संसदेची कार्यवाही 24 मार्चपर्यंत स्थगित राहील.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा करताना म्हटले की, मी पक्ष नेते पदावरून तसेच पक्षाकडून पुढील नेत्याची निवड होईपर्यंत पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे. काल रात्री मी लिबरल पार्टीच्या अध्यक्षांना ही प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे.

नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, 24 मार्चपर्यंत लिबरल पार्टी आपल्या नवीन नेत्याची निवड करेल. राजकीय उलथापालथीनंतर हे स्पष्ट झाले नाही की, कॅनडात सार्वत्रिक निवडणूक कधी घेतली जाईल.

जस्टिन ट्रूडो 2015मध्ये कंजर्वेटिव पार्टीचे सरकार पडल्यानंतर पंतप्रधान बनले होते. मागील जवळपास दहा वर्षे ट्रूडो पंतप्रधान पदावर कायम होते, सुरुवतीच्या काळात ते प्रचंड लोकप्रियही ठरले होते. मात्र मागील काही काळापासून विशेष करून जेव्हापासून भारतासोबत त्यांचे संबंध ताणले गेले तेव्हापासून ते टीकेला सामोरे जात होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT