Prashant Kishor News : ...तर प्रशांत किशोर यांना तुरुंगात जावे लागणार!

Prashant Kishor and BPSC : प्रशांत किशोर यांना पोलिसांनी पहाटे 4 वाजता ताब्यात घेतले आहे ; बिहारमध्ये BPSC परीक्षेत झालेल्या गोंधळावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे.
Prashant Kishor
Prashant KishorSarkarnama
Published on
Updated on

Prashant Kishor Support BPSC Protest : बिहारमध्ये BPSC परीक्षेत झालेल्या गोंधळावरून आंदोलन करणाऱ्या सर्व परीक्षार्थींच्या समर्थनात पाटणामधील गांधी मैदानात बेमुदत उपोषणास बसलेले जनसुराज पार्टीचे प्रमुख आणि प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांना पोलिसांनी सोमवारी पहाटे 4 वाजता ताब्यात घेतले. दुपारी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलं, जिथून त्यांना जामीन मिळाला.

सोमवारी पहाटे जवळपास 3 ते 4 वाजेच्या दरम्यान पोलिसांनी(Police) त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर त्यांना उपचारासाठी पाटणामधील एम्स रूग्णालयात दाखल केले गेले. यावेळी रूग्णालयाबाहेर प्रशांत किशोर यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. हे समर्थक रूग्णवाहिका आतमध्ये जाऊ देत नव्हते. महिला समर्थकही मोठ्याप्रमाणात होत्या. यावर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून रुग्णवाहिका आतमध्ये नेली.

प्राप्त माहितीनुसार प्रशांत किशोर(Prashant Kishor) यांनी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास आणि उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. तेच डॉक्टरांनी सुरुवातीच्या तपासणीनंतर कोणत्याही प्रकारचे काळजीचे कारण नसल्याचे म्हटले आहे. तर या संपूर्ण घटनाक्रमात अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता यावर दुसऱ्या पक्षाच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत.

Prashant Kishor
Naxal Attack News : छत्तीसगढमध्ये मोठा नक्षली हल्ला; वाहनाद्वारे IED स्फोट, आठ जवान शहीद!

प्रशांत किशोर यांना न्यायालयाने 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. याचबरोबर त्यांना हे लिहून द्यावे लागेल की ते भविष्यात असं करणार नाहीत. पीके यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की, त्यांनी जामीनाची ही अट मानण्यास नकार दिला आहे.

Prashant Kishor
India Gate Name Change : ‘इंडिया गेट’चे नाव बदलण्याची भाजप नेत्याची मागणी; थेट मोदींना पत्र लिहून सुचवलं खास नाव...

आंदोलन करणे हा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे ते असं लिहून देत नाहीत. जर प्रशांत किशोर यांनी सशर्त जामीनपत्र भरले नाही तर त्यांना तुरुंगात जावे लागू शकते. याप्रकरणी ते वरिष्ठ वकिलांशी चर्चा करत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com