Priyanka Gandhi  Sarkarnama
देश

MP Election 2023 : गद्दार..., प्रियंका गांधींचा ज्योतिरादित्यांवर घणाघात; पार्टटाईम नेत्या म्हणत शिंदेंचा टोला

Jyotiraditya Scindia Replies Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या टीकेला भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे....

Sachin Fulpagare

Madhya Pradesh Election 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी 'गद्दर' म्हणत भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनीही प्रियंका गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.

प्रियंका गांधी या पार्टटाईम नेत्या आहेत. बैद्धीक पात्रतेची तुलना शारीरीक उंचीशी करणाऱ्यांनी अंहकाराचा धडा शिकवण्याआधी आरशात डोकावून बघावं, असा टोला ज्योतिरादित्य यांनी लगावला आहे. भ्रष्टाचारी आणि आश्वासनांपासून पळ काढणाऱ्यांचे सरकार शिंदे घराण्याने सतत बदलले आहे. यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसचा पुन्हा एकदा सुपडा साफ होणार आहे, असा ठाम विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

कुठल्या घराण्याने अफगाण्यापासून ते मुगल आणि इंग्रजापर्यंत भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावली होती आणि चीनच्या आक्रमणापासून भारताची सुरक्षा करणं दूरच त्यांना भारतीय भूमी भेट म्हणून कोणी दिली होती? कोणी सत्तेसाठी देशात आणीबाणी लावली? आज विदेशात जाऊन आपल्याच देशाची बदनामी कोण करतंय?, असे प्रश्न विचारत शिंदे यांनी प्रियंका गांधींवर पलटवार केला आहे.

काय म्हणाल्या होत्या प्रियंका गांधी?

मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांनी आल्या होत्या. भाजपचे सर्व नेते विचित्र टाइपचे आहेत. एक शिंदे आहे, ज्यांच्यासोबत मी यूपीत काम केलं. उंचीत ते थोडे कमी पडले. पण अहंकार इतकी की वाह भाई वाह... यूपीतील लोक नाराजी, राग सगळंच बोलून मोकळे होतात. पण महाराज बोलण्याची त्यांना सवय नाही. त्यांच्याकडे जाणारा कार्यकर्ता गेल्यावर त्याला महाराज म्हणावं लागत होतं. आपल्या तोंडून महाराज निघाले नाही तर कुठलं काम होत नव्हतं, असं म्हणत प्रियंका गांधींनी ज्योतिरादित्य शिंदेंवर टीका केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT